साताऱ्यात राष्ट्रवादीच ठरलं?; उदयनराजेंविरोधात 'हे' लढणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 September 2019

अखेर सर्वांचे लक्ष लागलेली सातारा लोकसभेची पोट निवडणूक आताविधानसभेसोबत होणार असून 21 तारखेला मतदान होईल. राष्ट्रवादीच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि बदला घेण्याची असेल. त्यासाठी दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी साताऱ्यात जाहीर मेळाव्यात जिल्ह्यातील पक्ष्याच्या कार्यकर्त्यांना चार्ज केले आहे.

सातारा : विधानसभेसोबतच सातारा लोकसभेची पोट निवडणुक होत असल्याने साताऱ्यात राष्ट्रवादी कडून भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात श्रीनिवास पाटील यांचेच नाव अंतिम होणार आहे. राष्ट्रवादीसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक असून, शरद पवार यांना फसविल्याचा बदला समस्त राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घेणार आहेत.

अखेर सर्वांचे लक्ष लागलेली सातारा लोकसभेची पोट निवडणूक आताविधानसभेसोबत होणार असून 21 तारखेला मतदान होईल. राष्ट्रवादीच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि बदला घेण्याची असेल. त्यासाठी दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी साताऱ्यात जाहीर मेळाव्यात जिल्ह्यातील पक्ष्याच्या कार्यकर्त्यांना चार्ज केले आहे. राष्ट्रवादीकडून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनाच उतरविले जाणार आहे. सध्या त्यांच्याकडे जिल्हा अध्यक्ष सुनील माने आणि श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सारंग पाटील हेही इच्छुक आहेत. पण उदयनराजे विरोधात सक्षम आणि अनुभवी म्हणून श्रीनिवास पाटील योग्य उमेदवार असल्याने त्यांचे नाव पवार यांनी अंतिम केले असल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार यांना फसवून  उदयनराजे भाजपमध्ये गेले आहेत. याचा राग राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे.

सोबत उदयनराजे यांच्या विषयी जनतेत नाराजी आहे.आता सर्वजण उघडपणे बोलू लागले आहेत. परिणामी उदयनराजे यांना पराभूत करण्यासाठी श्रीनिवास पाटील हेच सक्षम उमेदवार असल्याने पवार यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात त्यांचे लॉंचिंग केले आहे. मुळात श्रीनिवास पाटील हे इच्छुक नव्हते पण पवार साहेबाना फसविल्याचा बदला घेण्यासाठी ते तयार झाले आहेत. त्यामुळे साताऱ्यात लोकसभेसाठी पुन्हा एकदा भाजप विरोधात राष्ट्रवादी अशी चुरशीची लढत होणार आहे. यामध्ये उदयनराजे पुन्हा आपला करिश्मा भाजपच्या माध्यमातुन दाखविणार का, याची उत्सुकता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara loksabha bypoll with Maharashtra Vidhan Sabha 2019 NCP candidate final