हॅलाे...यांचे हे राेजचेच सुरु आहे...थकले आता मी...काय करु

हॅलाे...यांचे हे राेजचेच सुरु आहे...थकले आता मी...काय करु
Updated on

सातारा : रोज बाहेर हुंदडायची सवय असणाऱ्यांना घरातच कोंडून पडावे लागत आहे... संचारबंदी असल्यामुळे अडकून पडलेल्यांना कुटुंबात जाता येत नाही... दारूबंदी असल्यामुळे तलप भागवायची कशी... लॉकडाउनच्या काळात नागरिकांची मानसिकता बिघडणारे असे अनेक 

विषय समोर येत आहेत. यावर मात करण्यासाठी आवश्‍यकता आहे, ती समुपदेशनाची. या कालावधीत नागरिकांना आधार देत, त्यांचे मानसिक स्वास्थ उत्तम ठेवण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये फोनद्वारे समुपदेशनाची सुविधा उपलब्ध केली आहे. त्याचबरोबर जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यासाठी काही टिप्सही दिल्या आहेत. 
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात आणि राज्यात 23 मार्चपासून पहिले लॉकडाउन सुरू झाले. 14 एप्रिलला त्यामध्ये सूट मिळेल, अशी सर्वांची अपेक्षा होती; परंतु ती अपेक्षा फोल ठरली. देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढतच असल्याने तीन मेपर्यंत पुन्हा संचारबंदी लागू झाली आहे. 

या कालावधीत नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव आहे. त्यामुळे बाहेर फिरण्याची सवय असलेल्या अनेकांची अडचण झाली आहे. त्याचप्रमाणे घर सोडून नोकरीसाठी दुसऱ्या ठिकाणी आलेले नागरिकही कामाच्या ठिकाणीच अडकले आहेत. कुटुंबाकडे जाता येत नसल्याने त्यांच्या मनाचीही घालमेल होत आहे. त्याचबरोबर दारूबंदी व अन्य व्यसनांच्या साधनांचे वाढलेल्या दरानेही अनेक जणांत अस्वस्थता आहे. त्यामुळे अनेकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. त्यातून काही चुकीच्या गोष्टी घडू नयेत, यासाठी शारीरिक बरोबर मानसिक स्वास्थ्य टिकवणेही अत्यावश्‍यक बनले आहे. 

मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी हे करा 

  •  सर्वात प्रथम आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करा 
  •  सातत्याने सकारात्मक दृष्टिकोन ठेवा 
  •  ही सुवर्ण संधी समजून कुटुंबीयांना भरपूर वेळ द्या 
  •  घरातील सदस्यांबरोबर मनमोकळ गप्पा मारा, एकमेकांचे चांगले गुण समजून घ्या 
  •  वेळेअभावी न जोपासता आलेला छंद पूर्ण करण्याचा प्रयत्न करा 
  •  योग्य ते अंतर राखून घरामध्येच कुटुंबासोबत व्यायाम करा 
  •  दररोज किमान 30 मिनिटे योगासने करा 
  •  व्यसन सोडण्यासाठी सुवर्णसंधी समजून ते सोडण्याचा प्रयत्न करा 
  •  हे ही दिवस नक्कीच जातील यावर विश्‍वास ठेवा 

हे करू नका 

  •  टीव्ही व मोबाईलवर कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या बातम्या वारंवार वाचू व पाहू नका 
  •  कोरोना या आजारावर कमीतकमी चर्चा करा 
  •  तेलकट व मसालेदार पदार्थांचा जेवणात वापर टाळा 
  •  शीतपेय घेणे टाळा 
  •  घरांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून होणारे वाद टाळा 
  •  नकारात्मक गोष्टी व शब्द यांचा वापर करणे टाळा 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam released water through its spillway gates for the first time this monsoon after the reservoir level increased due to continuous rainfall.
RBI penalty on Sangli District Central Cooperative Bank
Almatti Dam Supreme Court dispute
Shashikala Jolle complaint to Nitin Gadkari
Marathi News Esakal
www.esakal.com