शिकार करायची होती डुकराची पण झाली म्हैशीची

जालींदर सत्रे
गुरुवार, 25 जानेवारी 2018

पाटण (जि. सातारा): रान डुक्कराची शिकार करण्यासाठी आलेल्या शिकारीने केलेल्या गोळीबारात म्हैस ठार झाली. कोयनानगर येथील पोस्ट ऑफीसच्या मागील बाजूस झाडीत बुधवारी (ता. 24) रात्री ही घटना घडली. रात्रीच्या किर्र अंधारात झुडूपांची हालचाल झाली. तेथे रानडुक्कर असावे असे समजून गोळी घातली. मात्र, त्यात म्हैस ठार झाली. बाबुराव धाकल बावधने (रा. देशमुखवाडी-कोयना) असे संबधित म्हैस मालकाचे नाव आहे.

कोयनानगर येथील पोस्ट कार्यालयामागे काल रात्री गोळी झाडून म्हैसेची हत्या करण्यात आली. म्हैस ज्या भागात मारली गेली. त्या भागात मोठ्या प्रमाणात रानडुक्कर येतात. त्यांच्यावर निशाना ठेवून बसलेल्या शिकारीने अंधारात, अंदाजे रानडुक्कर आहेत, असे समजून गोळीबार केला. त्यात म्हैस ठार झाली. त्यानंतर गोळीबार करणारे पसार झाले आहेत.  

बावधने यांचे देशमुखवाडी मुळ गाव आहे. त्यांची पंधरा ते वीस जनावरे आहेत. ते चरण्यास कोयना परिसरात सोडतात. नेहमीचा मार्ग असल्याने जनावरे दररोज येत असतात. कालही जनावरे आली. मात्र, म्हैस गायब होती. सकाळी पोस्टामागे गोळी घातल्याने म्हैस ठार झाल्याची गोष्ट बावधने यांना समजले. त्यांनी तेथे जावून पाहिले व म्हैस ओळखली. रस्ता चुकलेली म्हैस शिकारींच्या गोळीची बळी ठरली होती. रानडुक्कर समजून अंधारात झालेला गोळीबार म्हशीचे प्राण घेणारा ठरला. त्याची वन विभागाने नोंद घेतली आहे. मानेच्या खाली गोळी लागल्याने म्हैस जागीच ठार झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: satara news buffaloes hunting in patan