esakal | माण: बोअरवेलमध्ये पडलेल्या मंगेशचा अखेर मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Satara news Death of Mangesh, who fell into a borewell, died later

सुटी असल्याने शेतात 
मंगेशच्या आई-वडिलांना या दुर्घटनेचा जबरदस्त धक्का बसला होता. दोघेही शेतात मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी मंगेशला याच जूनमध्ये पहिल्या इयत्तेत शाळेत घातले आहे. आज शाळेला सुटी असल्यामुळे तो आईसमवेत गुरे राखण्यासाठी शेतात आला होता. 

माण: बोअरवेलमध्ये पडलेल्या मंगेशचा अखेर मृत्यू

sakal_logo
By
अंकुश चव्हाण

म्हसवड - विरळी (ता. माण) नजीकच्या कापूसवाडी येथे उघड्या बोअरवेलमध्ये पडलेल्या पाच वर्षांंच्या मंगेश जाधव अखेर श्वास गुदमरून मृत्यू झाला. पहाटे अडीचच्या सुमारास त्याने अखेरचा श्वास घेतला. 

सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास तो बोअरवेलमध्ये पडला होता. मंगेश अनिल जाधव असे या बालकाचे नाव असून, त्याला बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर अडीचच्या सुमारास त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र, त्याच्या नाकात व तोंडात माती गेल्याने त्याचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. एनडीआरएफच्या जवानांनी त्याला बाहेर काढून म्हसवड येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की विरळी येथील मंगेश हा त्याची आई रूपाली यांच्यासोबत शेतात गुरे चारण्यासाठी गेला होता. तेथे खेळताना तो बोअरवेलमध्ये पडला व सुमारे वीस फूट खोल तो अडकला. ही बोअरवेल शेतीच्या पाण्यासाठी सुमारे 650 फूट खोल खोदण्यात आली होती; परंतु पाणी न लागल्याने सुरक्षितरीत्या न बुजवता तशीच उघडी सोडून देण्यात आली होती. 

याच उघड्या बोअरवेलमध्ये मंगेश खेळताना पाय घसरून पडला. दुर्घटनेनंतर नजीकच असलेली मंगेशची आई रूपाली यांनी आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थ मदतीला धावले. मंगेशला सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. ग्रामस्थांनी दोन जेसीबीच्या साह्याने बोअरवेलनजीक खोदाई सुरू केली. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती म्हसवड पोलिस ठाणे व माणचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार सुरेखा माने यांनाही तातडीने देण्यात आली. त्यांना या कामी मदत करण्याची विनंती करताच हे दोन्ही अधिकारी व म्हसवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण पोलिस कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच परिसरातील गावांतील लोक घटनास्थळी दाखल होऊ लागले. मदतीसाठी प्रशासकीय पातळीवरूनही हालचाली सुरू झाल्या होत्या. घटनास्थळी रुग्णवाहिका बोलावून मंगेशसाठी बोअरवेलमध्ये ऑक्‍सिजन सोडण्यात येत होता. रात्री आठ वाजेपर्यंत जेसीबीने सुमारे 17 फूट खोलीपर्यंत बाजूचा खड्डा खोदण्यात आला. मात्र, तोपर्यंत मंगेश बोअरच्या खड्ड्यामध्ये आणखी तीन ते चार फूट खाली घसरला होता, असे सांगण्यात येत होते. त्यामुळे बाजूचा खड्डा आणखी खोदण्याचे काम सुरू होते. पुणे येथून एमडीआरएफचे पथक पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संपर्क साधला आणि रात्री उशीरा पथक घटनास्थळी पोचले. एनडीआरएफचे पथक, ग्रामस्थ आणि पोलिसांनी आपल्या परीने कार्य करत मंगेशला बाहेर काढले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. 

सुटी असल्याने शेतात 
मंगेशच्या आई-वडिलांना या दुर्घटनेचा जबरदस्त धक्का बसला होता. दोघेही शेतात मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी मंगेशला याच जूनमध्ये पहिल्या इयत्तेत शाळेत घातले आहे. आज शाळेला सुटी असल्यामुळे तो आईसमवेत गुरे राखण्यासाठी शेतात आला होता. 

loading image
go to top