भाजपची स्मृती अभिवादन यात्रा तर राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन

file photo
file photo

कऱ्हाडमध्ये होणार दोन्ही पक्षांचे शक्तीप्रदर्शन; कलगीतुराही रंगणार

कऱ्हा़ड (सातारा); राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारच्या कारभाराविरोधात जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या कऱ्हाड येथील प्रितिसंगमावरील समाधीस्थऴी अभिवादन करुन जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह त्यांच्या नेत्यांच्या उपस्थितीत हल्लाबोल आंदोलनाचा श्रीगणेशा करण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, भाजपनेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत ज्य़ेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण स्मृती अभिवादन यात्रेचे आयोजन केले आहे. त्यामुळे कऱ्हाडमध्ये शनिवारी (ता. 25) राजकीय कलगीतुराच रंगणार असून, त्यातून कऱ्हाडमध्ये दोन्ही पक्षांचे शक्तीप्रदर्शनही होणार आहे.

जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे उद्या शनिवारी पुण्यतिथी आहे. त्यानिमीत्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री, खासदार, आमदार, नेते, पदाधिकारी यांची प्रितिसंगामावरील त्यांच्या समाधिस्थळी दरवर्षी मांदियाळी असते. त्यांच्या समाधीस अभिवादन करुन संबंधित मान्यवर जात असतात. यंदा मात्र त्या अभिवादनाचे औचित्य साधुन राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे आपापल्या पक्षांच्या धोरणाप्रमाणे कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या धोरणाविरोधात आणि फसव्या कर्जमाफीसह अन्य घोषणांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे पक्षाने कळवले आहे. त्यामध्ये उद्या सकाळी आठ वाजता पक्षाचे अध्यक्ष जेष्ठ नेते श्री. पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत हल्लाबोल आंदोलन करण्यात येवुन राज्यभर ते पोचवण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण यांचे समाधिस्थळ ते प्रांत कार्यालय दरम्यान त्यासाठी मोर्चा काढून तेथे मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. दरम्यान, भाजपनेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत ज्य़ेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण स्मृती अभिवादन यात्रेचे आयोजन केले आहे. उद्या सकाळी सात वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे शक्तीप्रदर्शनच यानिमीत्ताने कऱ्हाडमध्ये होणार असून, त्यासाठी दिग्गज नेते व मंत्री कऱ्हाडमध्ये मुक्कामी आहेत. त्यामुळे कऱ्हाडमध्ये उद्या राजकीय कलगीतुराच रंगणार असल्याचे दिसते.

टायमिंगसाठी मुक्काम
राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात करण्यासाठी उद्या सकाळी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन झाल्यावर सकाळी आठ वाजताचे टायमिंग ठरवले आहे. तर भाजपने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याचे औचित्य साधून सकाळी सात वाजता अभिवादन यात्रेचे आय़ोजन केले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांना कऱ्हाडमध्ये आज मुक्कामीच यायला लागले.

उध्दव ठाकरेंची रविवारी सभा
शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे रविवारी कऱ्हाड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत दुपारी साडेबारा वाजता ओगलेवाडी येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून दुपारी एक वाजता पालिकेशेजारील जनता व्यासपिठावर त्यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा होणार आहे. पालकमंत्री विजय शिवतारे, खासदार विनायक राऊत, गजानन किर्तीकर, आमदार शंभुराज देसाई, संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील उपस्थित राहणार आहेत. त्यांनीही सभेसाठी कऱ्हाडच निवडल्याने कऱ्हाडमध्ये कलगीतुराच रंगणार आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com