वाळू उपसा करणाऱ्यांकडून तलाठ्यास जिवे मारण्याचा प्रयत्न

संदीप कदम
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

वारंवार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्याच्या निषेधार्थ फलटण तालुका तलाठी संघ लेखनी बंद आंदोलन करणार आहेत.

फलटण शहर : आदर्की (ता. फलटण) येथे अवैद वाळू उपसा करणाऱ्यांनी तलाठ्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फलटण - आदर्की रस्त्यावर (ता. २८) रोजी रात्री साडेसात वाजणेच्या सुमारास अनधिकृत वाळू वाहतूक करणारे दोन डंपर भरारी पथकाने अडविले. यावेळी संजय पवार, धनंजय कदम, प्रशांत भुजबळ, बाबू पवार व इतर ३ जणांनी भरारी पथकातील तलाठी यांना मारहाण, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. व जखमी अवस्थेतील तलाठी किशोर वाघ यांना मारहाण करून नजीकच्या नाल्यात फेकून दिले.

सदर घटनेबाबत लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वारंवार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्याच्या निषेधार्थ फलटण तालुका तलाठी संघ लेखनी बंद आंदोलन करणार आहेत. तर वाळू माफियांवर  एमपीडीए कलम  व  मोका अंतर्गत संबंधितांवर कारवाईचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात यावा यासाठी आज सकाळी ११ वा लेखनी बंद आंदोलनाचे निवेदन तहसिलदारसो फलटण यांना देण्यात येणार आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: satara news phaltan sand mafia attempts to murder talathi

टॅग्स