कबड्डी, खो-खो, बुद्धिबळपटूंना नोकरीत आरक्षण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

सातारा - राज्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय, इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. एक जुलै 2017 मध्ये शासनाने ठेवलेल्या क्रीडाविषयक अर्हतेत अशंतः बदल केला आहे. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स या स्पर्धांत समावेश असलेले खेळ व बुद्धिबळ तसेच कबड्डी, खो-खो हे देशी खेळच पाच टक्के आरक्षणासाठी पात्र राहणार आहेत. 

सातारा - राज्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय, इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. एक जुलै 2017 मध्ये शासनाने ठेवलेल्या क्रीडाविषयक अर्हतेत अशंतः बदल केला आहे. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स या स्पर्धांत समावेश असलेले खेळ व बुद्धिबळ तसेच कबड्डी, खो-खो हे देशी खेळच पाच टक्के आरक्षणासाठी पात्र राहणार आहेत. 

शासनाने याबाबत दहा ऑक्‍टोबरला सर्वसमावेशक सूचनांचा अध्यादेश काढला आहे. यामध्ये गट "अ' साठी पात्र क्रीडा स्पर्धा ः अधिकृत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यामध्ये ऑलिपिंक क्रीडा स्पर्धा, एशियन्स गेम्स, जागतिक क्रीडा स्पर्धा, एशियन चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ गेम्स, कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप, युथ ऑलिंपिक, ग्रॅन्डमास्टर (बुद्धिबळ). 

पॅरालिंपिक गेम्स, पॅरा एशियन गेम्स, वर्ल्ड पॅरॉलिंपिक गेम्स, जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा बोर्डाने आयोजिलेले खेळ, आंतरराष्ट्रीय शालेय महासंघाद्वारा आयोजित जागतिक शालेय क्रीडा स्पर्धा, ग्रॅन्ड मास्टर किताब. 

गट "ब' साठी पात्र क्रीडा स्पर्धा ः गट "अ' पदाकरिता विहित केलेले खेळविषयक अर्हता धारण करणारा खेळाडू अथवा अधिकृत आंतरराष्ट्रीय कनिष्ठ गटातील ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप, युथ कॉमनवेल्थ गेम्स, कनिष्ठ गटातील एशियन चॅम्पियनशिप, कनिष्ठ गटातील कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप, आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धा (बुद्धिबळ), अधिकृत राष्ट्रीय अजिंक्‍यपद वरिष्ठ गट स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय ज्युनिअर गट अजिंक्‍यपद स्पर्धा, पॅरा ऑलिंपिक राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धा, राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय ग्रामीण व महिला क्रीडा स्पर्धा, अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा, आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धा. 

गट "क' साठी पात्र क्रीडा स्पर्धा ः गट "अ' व गट "ब' पदाकरिता विहित केलेले खेळविषयक अर्हता धारण करणारा खेळाडू अथवा राज्यस्तरीय वरिष्ठ गटातील अजिंक्‍यपद स्पर्धा, राज्यस्तरीय कनिष्ठ गटातील अजिंक्‍यपद स्पर्धा, राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा, राज्यस्तरीय ग्रामीण व महिला क्रीडा स्पर्धा, राज्यस्तरीय आदिवासी क्रीडा स्पर्धा, राज्यस्तरीय पॅराऑलिंम्पिक क्रीडा स्पर्धा, राज्यस्तरीय अपंग क्रीडा स्पर्धा. 

गट "ड' साठी पात्र क्रीडा स्पर्धा ः गट "अ', गट "ब' व गट "क' पदाकरिता विहित केलेले खेळविषयक अर्हता धारण करणारा खेळाडू अथवा वरिष्ठ गटातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतील सहभाग, पॅराऑलिंपिक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा वरिष्ठ गटातील सहभाग. हे महत्त्वपूर्ण मुद्दे नमूद केले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satara news Players Job reservation