शाळा सुरू; पण गणवेश जुनाच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

सातारा - जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांत गुरुवारपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरीही गणवेश मात्र जुनाच राहिला आहे. राज्य सरकार यावर्षी गणवेशाची रक्‍कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्याची तीन कोटी ६५ लाखांची रक्‍कम जमा झाली 
नसल्याने विद्यार्थ्यांना नवीन गणवेश घेता आलेला नाही. तर पहिल्या दिवशी गणवेश देण्याची अनेक वर्षांची परंपराही यंदाही खंडित झाली आहे. 

केंद्र, राज्य सरकारने डिसेंबरमध्ये सरकारी योजनांचा लाभ देताना लाभाच्या वस्तू खरेदी करू न देता त्याचे पैसे थेट संबंधित नागरिकांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पुस्तके दिली जातात. 

मात्र, यंदाच्या वर्षी गणवेशाचे पैसे संबंधित विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या खात्यावर देण्याचा निर्णय सरकारने घेतला. गुरुवारपासून शाळा सुरू झाल्या असल्या तरीही सरकारने गणवेशाचे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नव्या गणवेशाविनाच शाळेत यावे लागणार आहे. दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके व गणवेश देण्याची परंपरा यंदा सरकारच्या निष्क्रियतेमुळे खंडित झाली.

सरकारने अद्यापही पैसेच दिले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश मिळणे दुरापास्त झाले. परिणामी विद्यार्थ्यांना जुनाच गणवेश घालून यावे लागले. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यासाठी तीन कोटी ६५ लाखाची मागणी केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून देण्यात आली. 

गणवेश खरेदीची पावती हवीच... 
विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर पैसे जमा केले जात होते. त्यानंतर शालेय व्यवस्थापन समिती गणवेश खरेदी करून त्याचे वाटप विद्यार्थ्यांना करत होती. आता विद्यार्थ्यांच्या पालकांनी गणवेश खरेदी करायचे आहेत. त्याची पावती शाळेच्या मुख्याध्यापकांना दाखवायची आहे. मुख्याध्यापकांनी संबंधित विद्यार्थ्याला गणवेश घेतल्याची खात्री केल्यानंतर विद्यार्थी व त्याच्या आईच्या संयुक्त खात्यावर गणवेशाचे चारशे रुपये जमा करायचे आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satara news school start but uniform old