साताराकरांनाे, दाेन दिवस पाणी येणार नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

ही पाइप तुटल्यामुळे शहरातील सदरबझार, भूविकास बॅंक परिसर, शाहूपुरी, करंजे, शाहूनगर, गोडोली या परिसरामध्ये जेथे-जेथे जीवन प्राधिकरणाकडून पाणी दिले जाते, त्या ठिकाणी दोन दिवस पाणी येणार नाही. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्राधिकरणाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.

सातारा : ग्रेड सेपरेटरच्या कामातून जाणारी शहर व उपनगरातील परिसराला पाणीपुरवठा करणारी जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी आज (बुधवार) दुपारी कोसळली. त्यामुळे शहर व उपनगरामध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
 
पोवई नाक्‍यावर मोनार्क चौक परिसरात सध्या ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. भुयारी मार्गासाठी या ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. दरम्यान, जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठ्याची मुख्य पाइपलाइन याच रस्त्यामधून गेलेली आहे. खोदकामामुळे ही पाइपलाइन असलेला काही भाग आज कोसळला. त्यामुळे पाइपही खाली पडल्या. त्यामुळे खोदकामाच्या ठिकाणी पाण्याचा लोट लागला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

पाइपलाइन टाकण्यासाठी सध्या त्या ठिकाणी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे पाइपलाइन कोठून टाकायची, याबाबतची पाहणी सायंकाळपर्यंत सुरू होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संरक्षक भिंतीच्या लगत पाइप टाकायची का, याबाबत चर्चा सुरू होती. परंतु, जागा ठरली तरी, पाइपलाइन टाकण्याच्या कामाला दोन दिवसांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे. ही पाइप तुटल्यामुळे शहरातील सदरबझार, भूविकास बॅंक परिसर, शाहूपुरी, करंजे, शाहूनगर, गोडोली या परिसरामध्ये जेथे-जेथे जीवन प्राधिकरणाकडून पाणी दिले जाते, त्या ठिकाणी दोन दिवस पाणी येणार नाही. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्राधिकरणाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. 

ब्रेकिंग : सुखावलेल्या सातारा जिल्ह्यावासियांना काेराेनाचा दणका
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara No Water Distribution For Two Days