ब्रेकिंग : सुखावलेल्या सातारा जिल्ह्यावासियांना काेराेनाचा दणका

ब्रेकिंग : सुखावलेल्या सातारा जिल्ह्यावासियांना काेराेनाचा दणका

कऱ्हाड ः कोरोनाची बाधा झालेल्या २३ रुग्णांनी जिद्दीने कृष्णा व सह्याद्री हॉस्पीटलमधील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आज (बुधवारी) कोरोनावर मात केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी रुग्ण बरे होवुन घरी सोडण्याची सातारा जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान बरे झालेल्या रुग्णांत वनवासमाची, साकुर्डी, आगाशिवनगर, उंब्रज, गोटे, बनवडी, गमेवाडी, तांबवे, मलकापुर, सातारा शाहुपुरी येथील रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान संबधितांना टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात घरी सोडण्यात आले.

कोरोना बाधीतांची संख्या सातारा जिल्ह्यात कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे पुण्या-मुंबईनंतर पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष कऱ्हाडकडे लागले आहे. दरम्यान बाधीतांची संख्या जास्त असली तरी रुग्ण कोरोनामुक्त होण्याचेही प्रमाण कऱ्हाड तालुक्यातीलच सर्वाधिक आहे. त्यासाठी येथील कृष्णा हॉस्पीटल, सह्याद्री हॉस्पीटल आणि वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयामार्फत युध्दपातळीवर उपचार करण्यात येत आहेत. त्याचा चांगला फायदा रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी होत आहे. सध्या कऱ्हाड तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या १०८ झाली आहे. मात्र आत्तापर्यंत कऱ्हाड तालुक्यातुन ७९ कोरोबाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर म्हारुगडेवाडीतील एका रुग्णाचा मृत्यु झाला आहे. दरम्यान कऱ्हाड व सातारा तालुक्यातील आज तब्बल २३ रुग्णांना येथील कृष्णा व सह्याद्री हॉस्पीटलमधुन घरी सोडण्यात आले. त्यामध्ये वनवासमाचीतील नऊ, मलकापुर व साकुर्डीतील प्रत्येकी दोन, आगाशिवनगर येथील चार आणि उंब्रज, गोटे, बनवडी, गमेवाडी, तांबवे व सातारा-शाहुपुरी येथील प्रत्येकी एक अशा २३ रुग्णांचा समावेश आहे. येथील दोन्ही हॉस्पीटलमधुन रुग्णांना घरी सोडताना टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात त्यांना निरोप देण्यात आला.

कृष्णा चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रविण शिणगारे, कुलसचीव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी.डी.जॉन, हॉस्पीटलचे मध्ये कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील, राजेंद्र संदे, डॉ. मनिषा लद्दड, डॉ. अपर्णा पतंगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, मंडल अधिकारी पी.डी. पाटील यांच्यासह डॉक्टर, हॉस्पीटलचे कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले. सह्याद्री हॉस्पीटलमधुन तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ आर. जी. काटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, सह्याद्रि हॉस्पिटलचे मुख्य फिजिशियन डॉ. संदीप बानुगडे, संचालक अमित चव्हाण, कामकाज प्रमुख डॉ. वेंकटेश मुळे, मार्केटिंग प्रमुख विश्वजीत डुबल आदी उपस्थित होते.

कृष्णाची अर्धशतकी भागीदारी

येथील कृष्णा हॉस्पीटलमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण बरे केले आहेत. एकट्या कृष्णा रुग्णालयातुन आत्तापर्यंत तब्बल ५४ रुग्णांना बरे करुन घरी सोडण्यात आले आहे. त्यासाठी तेथील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत. त्याच्या कष्टाचेचे हे फलीत आहे. त्यासाठी रुग्णालय प्रशासन आणि डॉ. सुरेश भोसले यांचेही योगदान मोलाचे आहे.

सह्याद्रीत २१ फिजीशीयन्सची फौज

सह्याद्रि हॉस्पिटलमधुन आठड्यातच २४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तेथे कोरोनावरील उपचार हे एम. डी. मेडिसिन डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कऱ्हाडमधील २१ फिजीशियन्स एकत्र येऊन सह्याद्रि हॉस्पिटल येथील कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यामुळे करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढु लागली आहे.

रात्री पुन्हा चार रुग्ण वाढले 

दरम्यान आज (बुधवार) रात्री सव्वा आठच्या सुमारास कऱ्हाड तालुक्यातील म्हासोली येथील एक, इंदोली येथील एक आणि भरेवाडी येथील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. दरम्यान तालुक्यातील बाधीतांची संख्या 112 झाली आहे. त्यामुळे तालुक्याची चिंता वाढली आहे. दरम्यान पोलिसांनी संबंधित गावांचा परिसर सील केला आहे.  

कऱ्हाड तालुक्यात मागील आठवड्यात कमी झालेले कोरोना बाधीतांचे प्रमाण या आठवड्यात झपाट्याने वाढत असल्याचे बाधीतांच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. काल रात्रीच म्हासोलीतील चार, शामगाव आणि चरेगाव जवळील खालकरवाडी येथील प्रत्येकी एक अशा सहा रुग्णांची भर पडली होती. त्यातुन म्हासोलीतील कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता तेथे साखळीच कार्यरत झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे वनवासमाची नंतर आता कऱ्हाड तालुक्यातील म्हासोली येथे प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे.

आजच तेथे जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांसमवेत तेथे भेट देवुन आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भातील सुचना केल्या आहेत. दरम्यान आज (बुधवारी) रात्री पुन्हा म्हासोलीतील एका रुग्णाची भर पडली आहे. त्याचबरोबर तालुक्यातील उंब्रज विभागातील इंदोली आणि उंडाळे विभागातील भरेवाडी येथील दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधीतांची संख्या वाढुन बुधवारी रात्री ती 112 झाली आहे. त्यामुळे तालुक्याची चिंता वाढली आहे.

दरम्यान संबंधित ठिकाणी पोलिसांनी सूक्ष्म कंटेनमेंट झोनअंतर्गत उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. संबंधित ठिकाणचे रस्ते वाहतुकीस बंद करुन तो परिसर सील करण्यात आला आहे. दरम्यान इंदोली आणि भरेवाडी येथे पहिल्यांदाच नवा रुग्ण सापडल्याने संबधित रुग्णांचे सहवासीत, निकटचे सहवासीत यांना ताब्यात घेवुन तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्याची कार्यवाही आरोग्य यंत्रणेने सुरु केली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या 177 झाली आहे. या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 69 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 98 आहे तर मृत्यु झालेले तीन रुग्ण आहेत. वाढलेले रुग्ण काेणत्या तालुक्यातील आहेत त्याची सविस्तर माहिती घेण्याचे काम आराेग्य विभागाचे सुरु आहे.

 आता हाॅटेल ढाब्यांवरील चवीचे पदार्थही मिळणार

नशीब बलवत्तर : मायलेकींसह तिघे वाचले


ढेबेवाडी खोऱ्यात अशी झाली कोरोनाची एन्ट्री

Video : एक टाळी विशेष मुलांसाठी वाजलीच पाहिजे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com