पाटण तालुक्यातील एकाचा मृत्यू; कोविडच्या मार्गदर्शक सुचनानुसार झाले अत्यंसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

मंगळवारी (ता.19) रात्रीच कऱ्हाड तालुक्यातील कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असतानाच मध्यरात्री संबधित व्यक्तीच्या मृत्यूने चिंता वाढली आहे.

कऱ्हाड : मुंबई ते पाटण असा प्रवास करणाऱ्या चाळीस वर्षाच्या व्यक्तीचा प्रवासातच मृत्यू झाला. संबधित व्यक्ती पाटण तालुक्यातील भारसाखळे येथील आहे. प्रवासात पुण्याजवळ त्याचा मृत्यू झाल्याने त्याला त्वरीत ससून रूग्णालयात हलविण्यात आले.

aschim-maharashtra/satara-district-new-20-corona-patients-found-today-night-295251" target="_blank">सातारकरांची झोप उडाली; कोरोनाचे 20 रुग्ण वाढले

तेथे संबंधित व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याला कऱ्हाड येथे आणण्यात आले. मात्र ती व्यक्ती मुबईहून प्रवास करून आली असल्याने त्यांची कोरोनाची तपासणीला स्वॅब घेण्यात आला आहे अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली.

रात्री दीडच्या सुमारास संबधित व्यक्तीवर कोविडच्या मार्गदर्शक सुचनानुसार येथील कोविड रूग्णांसाठी तयार केलेल्या स्मशानभूमीत पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी अत्यंसंस्कार केले. रात्रीच कऱ्हाड तालुक्यातील कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असतानाच मध्यरात्री संबधित व्यक्तीच्या मृत्यूने चिंता वाढली आहे. सातारा सातारा सातारा 

Video : कऱ्हाड पाेलिसांचा फंडा छत्री वापरा आणि काेराेनाला पळवा 

शिवेंद्रसिहराजे म्हणतात राज्यकर्त्यांनी जनतेला वार्‍यावर सोडलं

ब्रेकिंग न्यूज : आता हाॅटेल ढाब्यांवरील चवीचे पदार्थही मिळणार

शैक्षणिक स्‍पर्धेत टक्‍केवारीपासून सावधान..!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara One Traveller From Patan Died