प्रेमीयुगुलांसह हौशे नवशे गवश्यांनी घराबाहेर पडण्यापुर्वी ही बातमी वाचा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 मे 2020

राज्य व केंद्र सरकारने चौथा लॉकडाउन नुकताच जाहीर केला आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती अशीच राहिली तर शहरी भागांमध्ये ठाण मांडून बसलेला "कोरोना' ग्रामीण भागात देखील पसरायला वेळ लागणार नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने यावर वेळीच लक्ष घालून सातारकरांचे मौजमजेसाठी कास रस्त्याकडे येणारे लोंढे थांबवावेत आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कास (जि.सातारा)  : सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउनची स्थिती आहे. पर्यटनस्थळे ओस पडली आहेत. मात्र, साताऱ्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी लॉकडाउनमध्ये शिथिलता आणि पेट्रोल पंपांवर सर्वांना इंधन उपलब्ध होऊ लागताच, अनेक हौशे-नवशे-गवशे घरातून बाहेर पडून कासकडे जाणाऱ्या रस्त्यावर गर्दी करू लागले आहेत. त्यात प्रेमीयुगुलांची देखील मोठी भर पडत असल्याची स्थिती आहे.
 
चारचाकी वाहनांमध्ये दोन ते तीन व्यक्‍तींना परवानगी असताना सरसकट लोक या परिसरात जात आहेत. साताऱ्यातील काही उद्योगपतींनी या परिसरात जागा घेऊन हॉटेल व बंगले बांधले आहेत. ते तर कायम साताऱ्यातून ये-जा करत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. ग्रामीण भागामध्ये लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत. एवढेच नव्हे तर एका गावातून दुसऱ्या गावात एकाही नातेवाईकांना इकडे तिकडे ये-जा करण्यास परवानगी दिली जात नाही. मात्र, साताऱ्यातील लोकांची वर्दळ कास रस्त्यावर वाढल्याने एकीकडे भीती तर दुसरीकडे पोलिसांसह प्रशासनाच्या दृष्टिकोनावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
 
राज्य व केंद्र सरकारने चौथा लॉकडाउन नुकताच जाहीर केला आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती अशीच राहिली तर शहरी भागांमध्ये ठाण मांडून बसलेला "कोरोना' ग्रामीण भागात देखील पसरायला वेळ लागणार नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने यावर वेळीच लक्ष घालून सातारकरांचे मौजमजेसाठी कास रस्त्याकडे येणारे लोंढे थांबवावेत आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 
 
 
दोन महिने घरात अडकून वैतागलेले सातारकर आपल्या नजीकच्या कास पठाराकडे फिरायला येणे नित्याचे झाले आहे. त्यातच पेट्रोल आणि दारू मिळायला सुरवात झाल्याने कास रस्त्यावर सातारा शहरातून येणाऱ्या मद्यपी व प्रेमीयुगुलांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी लॉकडाउन तोडून कासकडे येणाऱ्यांना वेळीच रोखावे. 

सोमनाथ जाधव, सदस्य, कास पठार कार्यकारी समिती 

कासचा फेरफटका पडला महागात 

कास पठारासह कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर कोणत्याही ठिकाणी कामाव्यतिरिक्त जाण्यास बंदी आहे. तरीही सर्व काही ठिक झाल्याच्या व मोकळीक मिळाल्याच्या अविर्भावात कास पठारावर फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यांच्यावर आज तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सजन हंकारे यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली. तब्बल 45 वाहनांवर कारवाई करून 17 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोणत्याही नागरिकाने कास किंवा ठोसेघर परिसरात फिरण्यासाठी येऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

मासे खाण्याची चंगळ, तोच...

सातारा : खवय्यांसाठी पर्वणी; घरपाेच मागवा आवडीचे पदार्थ

आमच ठरलं : काेणत्या गावानं काेणत्या दिवशी बाजाराला यायचं

चला देश सेवेचा विडा उचलूयांत ! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Tourists Are Visiting Kass Plateau