गुड न्यूज : तब्बल 35 दिवसानंतर राज्यातील 'हे' हॉटस्पॉट केंद्र अखेर कोरोनामुक्त

गुड न्यूज : तब्बल 35 दिवसानंतर राज्यातील 'हे' हॉटस्पॉट केंद्र अखेर कोरोनामुक्त

वहागाव (जि. सातारा) : कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येने जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात "हॉटस्पॉट' बनलेल्या वनवासमाची (ता. कऱ्हाड) येथील 39 कोरोना बाधित रुग्ण आजअखेर कोरोनामुक्त झाले. आरोग्य विभागाने संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे व उपाययोजनांमुळे वनवासमाची 35 दिवसानंतर कोरोनामुक्त झाले.
पृथ्वीराज चव्हाणांचे देंवेद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज; नेत्यांत जुंपणार ? 

कोरोना आजाराने सर्वत्र चांगलेच थैमान घातले आहे. कऱ्हाड तालुक्‍यातील बाबरमाची येथील कोरोना संशयित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे वनवासमाचीतील (खोडशी) 35 वर्षीय युवक (ता. 21 एप्रिल) कोरोना बाधित असल्याची माहिती समोर आल्याने त्या वेळी वनवासमाचीसह परिसरात एकच खळबळ उडाली. त्या वेळी दुपारी अचानक आरोग्य विभागासह संबंधित पथके वनवासमाचीत पोचली. त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून तत्काळ वनवासमाचीच्या मुख्य प्रवेश मार्गासह, गावातील अंतर्गत सर्व रस्ते, दुकाने बंद करून गाव सील केले, तसेच गावातील ग्रामस्थांनी कोरोना आजाराबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत उंब्रजचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार व पथक सातत्याने जनजागृती करून सूचना करीत होते. मात्र, त्यानंतरही येथील रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली होती. 15 दिवसांत येथील रुग्ण संख्या 39 वर जाऊन पोचली होती. 
 
दरम्यान, वनवासमाचीची वाढती संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाच्या वतीने गावात सर्वत्र जंतुनाशक फवारणीसह विविध उपाययोजना करण्यात आल्या. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी गावातील 247 लोकांची स्वॅब तपासणी करण्यात आली, तसेच 198 लोकांना क्वारंटाइन करून त्यांना कऱ्हाडच्या वेगवेगळ्या संस्थांच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. वनवासमाचीतील बाधित रुग्णांवर कऱ्हाडच्या कृष्णा, सह्याद्री व उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. वाढती संसर्ग साखळी व आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाने गावात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांच्या मदतीने घरातच राहण्यास भाग पाडले. आरोग्य विभागाने गावातील सर्वांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर योग्य तो औषधोपचार करून त्यांना कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन केले. कऱ्हाडच्या अग्निशामक दलाच्या साहाय्याने संपूर्ण गावाची स्वच्छता करण्यात आली. आरोग्य विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अखेर वनवासमाची गाव कोरोनामुक्त झाल्याने येथील ग्रामस्थ आरोग्य विभागाचे आभार मानत आहेत.

साखर झोपेतच सातारा जिल्ह्याला धक्का; 52 पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू 
 
वनवासमाची गाव पूर्णतः लॉकडाउन केल्यामुळे तेथील व्यवहार पूर्णतः बंद आहेत. वाढत्या रुग्ण संख्येने येथील लोकांचे जीवनमान विस्कळित झाले आहे. आता कोरोनामुक्तीनंतर हे गाव लवकरच पूर्वपदावर येऊन येथील व्यवहार पुन्हा सुरळीतपणे सुरू होतील, अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांना आहे. वनवासमाची कोरोनामुक्त होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या येथील डॉ. संजय कुंभार व त्यांच्या आरोग्य विभागाच्या पथकाचा शासनाकडून योग्य सन्मान व्हावा, अशी अपेक्षा वनवासमाचीकरांतून व्यक्त होत आहे. 


तरीही 14 दिवस घ्यावी लागणार काळजी... 

कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. तो कधीही कोणालाही होऊ शकतो. सध्या वनवासमाची कोरोनामुक्त झाल्यानंतर याठिकाणी पुन्हा कोरोना संसर्ग साखळी निर्माण होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी मास्क वापरावेत, सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, तसेच खबरदारी म्हणून आणखी 14 दिवस घरातच राहणे गरजेचे आहे, असे मत डॉ. संजय कुंभार यांनी व्यक्त केले.

श्वास घेताे न घेताे ताेच तिसरा मृत्यू झाल्याचा अहवाल आला

क्वारंटाइनमुळे उजळले शाळेचे भाग्य; साबळेवाडीतील कुटुंबियांचे श्रमदान

साहित्य क्षेत्रालाही कोरोनाचा डंक

लॉकडाउनमध्ये मिशन शिष्यवृत्ती जावळी

  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com