सातारा जिल्ह्यातील 'या' गावाला एक दिवसाआड पाणी मिळणार

सातारा जिल्ह्यातील 'या' गावाला एक दिवसाआड पाणी मिळणार

भिलार : पाचगणीकरांवर कोरोना विषाणूचे सावट असताना आता पाणीटंचाईचे सावट येऊन ठेपले असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने उद्यापासून (ता.20) दिवसाआड पिण्याचे पाणी देण्याचे फर्मान सोडल्याने नागरिकांत असंतोषाची लाट पसरली आहे. 

वेण्णालेकमध्ये पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पाचगणीला उद्यापासून दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याचे पाचगणीतील "प्राधिकरणा'चे शाखा अभियंता श्री. बेळगावकर यांनी कळवले असल्याने अगोदरच कोरोनाचे संकट कोसळले असताना आता पाणीकपातीने डोके वर काढल्याने ऐन संचारबंदीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. 
कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. पर्यटन पूर्णपणे बंद आहे. बाहेरून येणारा पर्यटकांचा लोंढा बंद आहे.

पाचगणीतील पर्यटनावर अवलंबून असणारा हॉटेल व्यवसाय पूर्णपणे लॉकडाउन आहे. तसेच शहरातील शाळा बंद आहेत. त्यामुळे शहरावर असणारा अतिरिक्त भार पूर्णपणे 50 टक्‍क्‍यांवर आहे. त्यातच संचारबंदीने पाण्याचा वापरही कमी आहे. असे असताना प्राधिकरणाने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे आजारापेक्षा इलाजच भयानक असल्याचे वाटत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. वेण्णालेकमधील पाण्याची पातळी खालावली असली तरी संचारबंदीत पाण्यासाठी बाहेर कसे पडायचे, हाही मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

सातारा जिल्ह्यात दहा महिन्याच्या बाळासह तिघांना काेराेनाची लागण; त्या मृताच्या आईलाही लागण

भावा आपला पालकमंत्री पायाला भिंगरी लावूनच आपली काळजी घेताेय

 Video : 'या' गावातील पाच हजार कुटुंबाची चिंता वाढली 

ग्राहकांच्या साेयीसाठी आणि महावितरणला मदत हाेईल अशा प्रकारे एकमेकांना साह्य करण्याची आत्ताच वेळ आहे. सविस्तर जाणून घ्या 


सध्या नागरिकांत कोरोनाची भीती असताना पाणी कपातीचे दुहेरी संकट मानगुटीवर बसले आहे. कोरोनाच्या भीतीने घरात बसायचे की पाण्यासाठी बाहेर पडायचे, हा गंभीर प्रश्न पडला आहे. यातून प्राधिकरणाने मध्यम मार्ग काढावा. 
- सुनील उंबरकर, ग्राहक, पाचगणी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com