वीज ग्राहकांसाठी महत्वपुर्ण बातमी

वीज ग्राहकांसाठी महत्वपुर्ण बातमी
Updated on

कऱ्हाड ः वीज वितरण कंपनीकडून दर महिन्याला घरी येऊन मीटरचे रीडिंग घेतले जाते. एखाद्या रीडिंग नेण्याच्या वेळेस घर बंद असल्यास त्या महिन्याचे सरासरी बिल दिले जाते. त्याच धर्तीवर कोरोनामुळे 22 मार्चपासून लागू झालेल्या संचारबंदीमुळे वीज मीटरचे रीडिंग घेणे बंद केले आहे. त्यामुळे 22 मार्चनंतर रीडिंग घेतल्या जाणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर येणाऱ्या संदेशानंतर 24 तासात मीटर रीडिंग वीज कंपनीच्या ऍपवर अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, अन्यथा संबंधित ग्राहकांना सरासरी बिल आकारणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्वच वीज ग्राहकांना लॉकडाउन उठेपर्यंत यापुढे यानुसार वीज बिलाच्या आकारणीला सामोरे जावे लागणार आहे. 

वीज कंपनीने दरमहा घरोघरी मीटरचे रीडिंग घेणे अडचणी झाले आहे. त्यामुळे 22 मार्चपासून घरोघरी जावून मीटर रीडिंग घेणे वीज कंपनीने बंद केले आहे. त्याऐवजी वीज कंपनीने ग्राहकांना वीज कंपनीच्या मोबाईल ऍपद्वारे स्वतः मीटर रीडिंग अपलोड करण्याचा पर्याय दिला आहे. तसे आवाहनही वीज कंपनीकडून केले आहे. मात्र, अनेक ग्राहक या ऍपचा वापरच करत नसल्याने नेमके रीडिंग अपलोड करायचे कसे? हा त्यांच्यासमोर प्रश्‍न आहे. 22 तारखेनंतर ज्या ग्राहकांच्या मीटर रीडिंग होणार होते, त्यांनी त्यांच्या मोबाईवर आलेल्या संदेशानंतर संबंधित ऍपवर 24 तासांच्या आत मीटर रीडिंग अपलोड करणे अनिवार्य आहे. या कालावधीत ग्राहकांकडून रीडिंग अपलोड न झाल्यास संबंधित ग्राहकांना ज्याप्रमाणे दरवाजा बंद असल्यावर एखाद्या महिन्यात सरासरी बिल येते, त्या पध्दतीने यावेळेस सरासरी बिल देण्याचा मार्ग वीज वितरण कंपनीने उपलब्ध केला आहे. त्यामुळे सध्या 22 मार्च ते 31 मार्चपर्यंत रीडिंग अपलोड न झालेल्यांना मार्च महिन्याचे सरासरी बिल येणार आहे. एक ते 14 एप्रिल यासह राज्यात 30 एप्रिलपर्यंत वाढवलेल्या लॉकडाउन काळामुळे ग्राहकांना एप्रिल महिन्याचे सरासरी बिल येणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीज कंपनीने ग्राहकांचे मीटर रीडिंग घेणे बंद केले आहे. त्यासाठी ग्राहकांच्या मोबाईलवर आलेल्या मेसेजनंतर 24 तासात ऍपवर रीडिंग अपलोड करण्याचा अथवा सरासरी बिलाचा पर्याय दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर मीटर रीडिंग घेणे सुरू होईल. ग्राहकांनी www.mahavitran.com येथे जाऊन मीटर रीडिंग अॅप डाऊनलाऊड करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांनी केले आहे.

Video : जिल्हाधिकारी साहेब तेवढं मटण, चिकन विक्री सुरू करा; कोट्यवधींची उलाढाल ठप्प

सलून व्यावसायिक आणि त्यांच्या ग्राहकांसाठी महत्वपुर्ण बातमी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why are Sangli gram panchayat funds stalled?
Chandoli Sanctuary wildlife attack protest
Ramdas Athawale receives highway protest memorandum
Wildlife Adapts to Rising Temperatures
Marathi News Esakal
www.esakal.com