मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी 'यांनी' मांडले दिल्लीत ठाण

Satej Patil On Delhi Tour For Ministry Post Kolhapur Marathi News
Satej Patil On Delhi Tour For Ministry Post Kolhapur Marathi News

कोल्हापूर - महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील व पी. एन. पाटील यांचे जोरदार प्रयत्न सुरू असून, या प्रयत्नांचाच भाग म्हणून सतेज पाटील यांनी थेट दिल्लीत ठाण मांडले आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनानंतर लगेच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल म्हणून दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून असलेले आमदार हसन मुश्रीफ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांच्या भेटी घेऊन आज कोल्हापूरला परतले. पी. एन. पाटील हेही दोन दिवसांपूर्वीच कोल्हापुरात दाखल 
झाले आहेत.

काँग्रेसमुक्त झालेल्या जिल्ह्याला केले भाजपमुक्‍त

गेल्या निवडणुकीत काँग्रेसमुक्त झालेल्या जिल्ह्याला भाजपमुक्‍त करून तब्बल चार जागा आणण्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार सतेज पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 
या जोरावर आपल्याला मंत्रिपद मिळावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पक्षनिष्ठ आणि सीनियर म्हणून आपल्यालाही मंत्रिपद मिळावे यासाठी पी. एन. यांनी फिल्डींग लावली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीला दोनच जागा मिळाल्या, त्यातही श्री. मुश्रीफ हे पक्षाचे वरिष्ठ नेते असल्याने त्यांचे मंत्रिपद निश्‍चित असले तरी ऐन वेळी त्यात अडथळा नको म्हणून तेही मुंबईत तळ ठोकून होते. पण मंत्रिमंडळ विस्तार ३० डिसेंबरपर्यंत लांबल्याने तेही रात्री रेल्वेने कोल्हापूरला निघाले. 

३० डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा

गेल्या निवडणुकीत सेनेने तब्बल सहा जिंकल्या होत्या, पण यावेळी त्यांना राधानगरीतून प्रकाश अािबटकर यांच्या रूपाने एकाच जागेवर विजय मिळवता आला. पक्षाच्या वाढीसाठी श्री. अािबटकर हेही मंित्रपदाच्या शर्यतीत असून त्यांच्यासाठी शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक प्रयत्नशील आहेत. इच्छुक जास्त असले तरी पक्षनिहाय मंित्रपदे किती कोणाच्या वाट्याला येणार यावर कोणाची वर्णी लागणार हे समजणार आहे. त्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com