
कोल्हापुरच्या पालकमंत्रीपदी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची वर्णी लागली आहे. सतेज पाटील यांच्या निवडीने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पालकमंत्री पदाच्या विषयावर तोडगा निघाला आहे.
अखेर कोल्हापुरला मिळाले `हे` पालकमंत्री
कोल्हापूर - कोल्हापुरच्या पालकमंत्रीपदी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची वर्णी लागली आहे. सतेज पाटील यांच्या निवडीने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पालकमंत्री पदाच्या विषयावर तोडगा निघाला आहे.
महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांना कोल्हापुरचे तर सतेज पाटील यांना भंडरा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते. परंतु, थोरात यांनी कोल्हापुरचे पालकमंत्रीपद स्वीकारले नव्हते. तर मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यात पालकमंत्रीपद मिळविण्यासाठी चढाओढ लागली होती. त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदचा पेच कायम होता. या स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. सतेज पाटील यांच्या निवडीने अखेर जिल्याला पालकमंत्री मिळाले.
पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या जाहीर झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांना कोल्हापुरचे पालकमंत्री, सतेज पाटील यांना भंडारा, हसन मुश्रीफ यांना अहमदनगरची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु, या निवडीनंतर दोन्ही मंत्री नाखूष होते. तर थोरात यांनी कोल्हापुरचे पालकमंत्रीपद स्वीकारण्यास अनुउत्सुकता दर्शविली होती.
थोरात यांनी नकार दिल्यानंतर पालकमंत्रीपदी विश्वजीत कदम यांची वर्णी लागण्याची शक्यता होती. परंतु, सतेज यांच्या निवडीने ती शक्यता फोल ठरली आहे. आता मंत्री मुश्रीफ हे अहमदगरचे पालकमंत्री आहेत. तर विश्वजित कदम यांच्याकडे सतेज पाटील यांच्याकडे असलेली भंडाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे.