चोरी करून प्रेयसिला पाठवायचा सेल्फी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

इस्लामपूर ः प्रेयसीला खूष करण्यासाठी घरफोडी, चोऱ्या करणारा सराईत गुन्हेगार इस्लामपूर पोलिसांच्या सतर्क रात्रगस्त करणाऱ्या पथकाला सापडला. त्याला पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने इस्लामपूर शहरात 7 घरफोड्या केल्याचे व अन्य ठिकाणीही मोठा डल्ला मारल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तो सराईत चोरटा असून त्याची शिराळा येथे प्रेयसी आहे. तिला पैसे व दागीने देऊन खुष करण्यासाठी हा चोरीचा करत होता. या बरोबरच चोरी केलेल्या ठिकाणचा सेल्फी घेऊन त्या प्रेयसीला चोरीचे ठिकाण पाठवत असल्याची धक्कादायक कबुली त्याने दिली आहे.

हवलदार आलमगीर लतीफ व किरण मस्के या दोन रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडल्याची माहिती पोलिस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे व पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी आज पत्रकार बैठकीत दिली. 

कुणाल संजय शिर्के (वय 24, रा, भवानीननगर) असे या संशयित चोरट्याचे नाव आहे. आठ दिवसात इस्लामपूर पोलिसांच्या रात्रगस्तीच्या पथकाने ही दुसरी मोठी कामगिरी केली आहे. गेल्या आठवड्यात मॉर्निंग वॉकला येणाऱ्या कुंभार यांचा खून करण्याचा कट रात्रगस्तीच्या पोलिसांच्यामुळेच उघडकीस आला होता. 

श्री. पिंगळे म्हणाले, "" रविवारी पहाटे अडीच वाजता कुणाल शिर्के हा वाघवाडी फाट्यावरुन भरधाव दुचाकी घेऊन इस्लामपूरच्या दिशेने येत होता. त्याला कोल्हापूर नाक्‍याजवळ पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने न थांबता गाडी आणखी सुसाट वेगात घेऊन निसटण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना त्याचा संशय आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. सावकार कॉलनी जवळ त्याला पकडण्यात आले. त्याच्या पाठीवर असलेली सॅक तपासताच त्यात कटावणी, रोख 82 हजार रुपये मिळून आले. यावरुन पोलिसांचा संशय बळावला. त्याला ताब्यात घेत इस्लामपूर पोलिस ठाण्यात आणत सखोल चौकशी केली असता त्याने कामेरी येथे घरफोडी करुन आल्याचे कबुल केले. तो सराईत चोरटा असून त्याची शिराळा येथे प्रेयसी आहे. तिला पैसे व दागीने देऊन खुष करण्यासाठी हा सर्व चोरीचा खटाटोप तो करत होता. या बरोबरच चोरी केलेल्या ठिकाणचा सेल्फी घेऊन त्या प्रेयसीला आज मी या ठिकाणी चोरी केली, यात एवढी रोख रक्कम व एवढ्या दागीन्यावर डल्ला मारल्याचे सांगत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी त्याच्यावर चोरी, घरफोडीचा गुन्हा दाखल करुन येथील आज न्यायालयात हजर केले असता 26 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. त्याने सलगरे, तासगाव, पंढरपूर, सोनसळ आदी ठिकाणी घरफोड्या केल्याचे प्राथमिक तपासात उघडक होत आहे. या बरोबरच त्याची टोळी आहे का? याचा तपासही इस्लामपूर पोलिस करीत आहेत.'' 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selfie to steal and send to a lover