सेनापती कापशी: पंचायत समिती गण ओबीसी महिलासाठी राखीव झाला आहे. त्याचबरोबर कागल पंचायत समिती सभापतिपदही ओबीसी महिलासाठी राखीव झाल्याने येथील निवडणूक अधिक रंगतदार ठरणार आहे. .मात्र, स्थानिकचे प्रमुख नेते खुल्या प्रवर्गातील असल्याने उमेदवारी करू शकत नाहीत. आरक्षणाने आता त्यांच्या उत्साहावर पाणी फिरले. आता महायुती, महाविकास आघाडी, अपक्ष अशी कोणाकडूनही उमेदवारी असली, तरी चिकोत्रा खोऱ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या सेनापती कापशी गावातील गटागटांतील कार्यकर्त्यांत असलेले सख्य आणि मोठ्या मतदार संख्येचे गाव याचा उमेदवार निवडीत प्रभाव राहू शकतो..OBC Reservation : ओबीसी आरक्षण सलग दुसऱ्यांदा लागू; मुश्रीफ, मंडलिक, घाटगे गटांकडून इच्छुकांची चाचपणी सुरू, माद्याळ गणात राजकीय तापमान वाढले..गेल्या निवडणुकीत सेनापती कापशी गणातून मंडलिक गटाच्या (शिवसेना) कै. कमल रघुनाथ पाटील (बाळेघोल) विजयी झाल्या. नंतर त्यांना सभापती होण्याची संधी मिळाली. यावेळीही कापशी गणात पुनरावृत्तीची संधी असल्याने येथील उमेदवारी निवडही सर्वच नेत्यांकडून अधिक विचारमंथनाने होईल..सेनापती कापशी गणात सेनापती कापशीसह मुगळी, नंद्याळ, बाळेघोल, हणबरवाडी, तमनाकवाडा, हळदवडे, मासा बेलेवाडी व करंजिवणे या गावाचा समावेश आहे. यामधील सेनापती कापशी या मोठ्या मतदारसंख्येच्या गावावर गणातील राजकारण फिरते..Nagpur ZP Reservation: जिल्हा परिषदेच्या ५७ गटांची आज आरक्षण सोडत; प्रस्थापितांना धक्का की मिळणार अभय?.शशिकांत खोत यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून येथे केलेले सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक आणि विविध विकासकामे, संपर्क ही बलस्थाने त्यांच्या उमेदवारीला लाभाची ठरू शकतात. या गणात विविध प्रश्नांसाठी ॲड. दयानंद पाटील यांनी सरपंच परिषदेच्या माध्यमातून आवाज उठवला, तर क्रीडा संकुलसाठी जागा आणि अन्य कामांतून माजी जिल्हा परिषद सदस्य परशुराम तावरे यांनी तरुणांना आकर्षित केले. .सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, स्व. सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याचे सहकार्य, त्यांचे संचालक आणि कर्मचारी यांचा संपर्क याचाही परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. तरुण अभियंते उमेश देसाई यांच्या संपर्काचाही प्रभाव आहे. .माजी आमदार संजय घाटगे आणि माजी सभापती दत्तात्रय वालावलकर यांचा गट आणि संपर्काचा परिणाम उमेदवार निवडी आणि निवडणुकीवरही होऊ शकतो. इच्छुकांतील अगदी मोजक्या उमेदवारांनी सरपंच, सदस्य अथवा पंचायत समिती सदस्य म्हणून काम केले आहे. त्या अनुभवाचा, त्यांनी केलेल्या कामाचा लाभ त्यांना मिळू शकतो. इच्छुक असे.मुश्रीफ गटाकडून (राष्ट्रवादी अजित पवार) सावित्री सिरसाप्पा खतकल्ले, मंडलिक (शिवसेना) गटाकडून सुनीता दत्तात्रय तेली, लक्ष्मी कमलाकर साळुंखे, हौसाबाई इंद्रजित कडाकणे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून वैष्णवी भोकरे, संजय घाटगे (भाजप) गटाकडून श्रद्धा सतीश कोळी, सुनीता सूर्यकांत (राजाभाऊ) माळी, समरजितसिंह घाटगे गटाकडून (राष्ट्रवादी शरद पवार) रोहिणी दिवटे, अश्विनी मकरंद कोळी, सुप्रिया आनंद दुधाळे, काँग्रेसकडून राजश्री दयानंद पाटील इच्छुक आहेत..दृष्टिक्षेपात २०१७ ची निवडणूककमल पाटील (शिवसेना) ः ६००८ विजयीदीपाली शिंदे (राष्ट्रवादी) ः ४७७६सुजाता देसाई (भाजप) ः ३८५८.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.