ज्येष्ठ चित्रकार डी. व्ही. वडणगेकर यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 October 2019

कोल्हापूर - येथील ज्येष्ठ चित्रकार दिनकर विठ्ठल तथा डी. व्ही. वडणगेकर (वय 88) यांचे आज निधन झाले. दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्या शाहूपुरीतील घरापासून अंत्ययात्रा निघाली. पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (बुधवारी) सकाळी साडेनऊ वाजता आहे. 

श्री. वडणगेकर यांनी जी. डी. आर्ट अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर काही काळ उषाराजे हायस्कूल, इस्लामपूर हायस्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर ते मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये रूजू झाले. काही काळ कला संचालनालयामध्ये त्यांनी सहाय्यक निरीक्षक म्हणून काम केले.

1958 पासून ते दिल्लीच्या ललित कला अकादमीचे सभासद होते. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले, तसेच कलानिर्मितीतही मोठे योगदान दिले. निवृत्तीनंतर ते कोल्हापूरात परतले. येथील कलामंदीर महाविद्यालयाच्या उभारणीत त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली. काही काळ मानद प्राचार्य म्हणून कामही केले आहे.

दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमध्येही ते ए. एम. अभ्यासक्रम शिकवत. 1954 ला सुवर्ण पारितोषिक तर 1958, 1972, 1986 ला राज्य कला प्रदर्शनात त्यांनी राज्य पुरस्कार मिळवले. त्याशिवाय कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दलही त्यांना विविध पुरस्काराने गौरवण्यात आले. 

पुरस्काराची रक्कम  दिली "कलामंदिर'साठी 
गेल्याच वर्षी येथील रंगबहार जीवनगौरव, कुमावत सेवा संघाचा कलारत्न जीवनगौरव आणि त्याचबरोबर नाशिक कलानिकेतन संस्थेच्या जीवनगौरव पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. नाशिक कलानिकेतन संस्थेच्या पुरस्काराची पंचवीस हजारांची रक्कम त्यांनी कलामंदिर महाविद्यालयाच्या इमारतीसाठी दिली होती.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior painter D. V. Vadangekar passed away