बांबू बेटाखाली सापडून सात मेंढ्यांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

देववाडी (ता.शिराळा) येथे वादळी वाऱ्यामुळे बांबूचे बेट उन्मळून पडल्याने त्याखाली सापडून दीपक सर्जेराव शिद (चिकूर्डे, ता. वाळवा) यांच्या सात मेंढ्या ठार झाल्या.

शिराळा : देववाडी (ता.शिराळा, जि. सांगली) येथे वादळी वाऱ्यामुळे बांबूचे बेट उन्मळून पडल्याने त्याखाली सापडून दीपक सर्जेराव शिद (चिकूर्डे, ता. वाळवा) यांच्या सात मेंढ्या ठार झाल्या. 14 मेंढ्या जखमी झाल्या आहेत. सुदैवाने मेंढपाळ वाचला. त्यांचे 1 लाख 15 हजारांचे नुकसान झाले.

याबाबत माहिती मिळाली, की आज सायंकाळी चार वाजता शिराळा व परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पाऊस आल्याने दीपक सर्जेराव शिद (चिकूर्डे, ता. वाळवा) हे मेंढरे घेऊन देववाडी परिसरात आले होते. अचानक पाऊस सुरू झाल्याने ते 60 मेंढरासह वारणा नदी काठच्या देववाडी येथील शेतात एका बांबूच्या बेटाखाली थांबले.

वादळी वाऱ्यामुळे बांबूचे बेटच हळूहळू कोसळू लागले. दीपक तेथून बाजूला पळाला. तोपर्यंत मेंढ्या त्या बांबूच्या बेटा खाली सापडल्या. दीपकने पोलीस पाटील मोहन वरेकर यांना माहिती सांगितली. आप्पासाहेब नांगरे, दिलीप वरेकर, गजानन शिंदे, धनाजी खोत यांनी तेथे धाव घेतली. संजय शिराळकर यांनी जे. सी. बी. च्या सहाय्याने बेट बाजूला काढून मेंढ्यांना बाहेर काढले. सात मेंढ्या मृत आढळल्या तर 14 जखमी झाल्या. सुदैवाने इतर मेंढ्या सुखरूप आहेत. घटनेचा पंचनामा केला आहेत. त्यात एका लाख 15 हजाराचे नुकसान झाले. हा पंचनामा पोलीस पाटील मोहन वरेकर, तलाठी बागडी, पोलीस हवलदार अशोक जाधव, विनोद जाधव यांनी केला. 

त्याचे नशीब बलवत्तर 

दीपक शिदने प्रसंगावधान राखून पळ काढल्याने इतर मेंढ्यांचा तरी जीव वाचला. तोच बेटा खाली सापडला असता, तर कोणाला लक्षात आले नसते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven sheep found dead in Bamboo Island

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: