चिमुकलीला म्हणाला मोर दाखवतो! अन्‌ तिच्यासोबत...

चिमुकलीला म्हणाला मोर दाखवतो! अन्‌ तिच्यासोबत...
Updated on

सोलापूर : बांधकामावर काम करणाऱ्या कामगाराने सात वर्षाच्या मुलीला मोर दाखवतो असे म्हणून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणात सुनील म्हेत्रे नावाच्या कामगारावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार, अत्याचार करणाऱ्या सुनील यास मुलीच्या कुटुंबीयांनी आणि परिसरातील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. सुनील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक नंदकिशोर सोळंखे तपास करीत आहेत.

हेही वाचा : तुम्हाला माहित्येय का... सोलापुरात किती गुन्हे घडले...? 

महिला वकिलास विष पाजण्याचा प्रयत्न 
तीन लाख रुपये घे आणि आमच्या बाजूने जबाब दे, असे म्हणून महिला वकिलास विष पाजवण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी निखिल नेताजी भोसले (वय 35, रा. होटगी रोड, सोलापूर) याच्यावर जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शहरातील एका वकिलाच्या कार्यालयात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. ऍड. आरती इंद्र रेडकर (वय 32, रा. शिंदे चौक, सोलापूर) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी निखिल हा तुला काहीतरी बोलणार आहे असे म्हणून वकिलाने आरतीला यांना बोलावले. तिथे निखिल याने तीन लाख रुपये घे आणि आमच्या बाजूने जबाब दे असे सांगितले. त्यावर आरती यांनी नकार दिल्याने आरोपी निखिल याने त्याच्या जवळील विषाची बाटली काढून आरती यांना विष पाजण्याचा प्रयत्न केला. आरती यांनी ते विष तोंडात जाऊ दिले नाही, असे फिर्यादीत नमूद केले आहे.  

बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल 
एकच रो हाउस तिघांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अनिल सिद्राम श्रीराम (वय 54, रा. पद्मानगर, सोलापूर) याच्यावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात मल्लिकार्जुन आरकाल यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायमूर्ती जे. एम. मिस्त्री यांनी बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश एमआयडीसी पोलिसांना दिले होते. त्यानुसार शनिवारी श्रीराम याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. श्रीराम याने अक्कलकोट येथे अनिकेत कन्स्ट्रक्‍शन या अंतर्गत रो हाउसेस स्कीम राबविली होती. आरकाल यांनी ठरल्याप्रमाणे श्रीराम यास 17 लाख रुपये दिले. त्यानंतर खरेदीखत करून देण्यास आरोपीने टाळाटाळ केली. आरकाल यांना विकलेला रो हाउस 8 मे 2003 रोजी गिरीश भीमराव सुलाखे यांना तसेच छा. प्र. साखरे या महिलेलाही 30 जून 2008 रोजी विकला होता. बनावट कागदाच्या आधारे आरकाल यांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणात फिर्यादी आरकालतर्फे ऍड. प्रशांत नवगिरे, ऍड. श्रीनिवास म्हेत्रे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com