पीडित मुलीवर संशयिताने अत्याचार करून कोणाला न सांगण्याची धमकी दिली. तासगाव पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
तासगाव : तालुक्यातील एका भागातील सात वर्षीय शाळकरी मुलीवर (School Girl) लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी त्याच परिसरातील सोळा वर्षीय शालेय विद्यार्थ्यावर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा (POCSO Crime) नोंदवण्यात आला.