ऑनलाईन बुद्धिबळमध्ये इराणचा शाहीन, प. बंगालचा अरण्यक घोष यांची बाजी

घनशाम नवाथे 
Wednesday, 21 October 2020

पुरोहित चेस ऍकॅडमीतर्फे आयोजित ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धांमध्ये इराणचा फिडे मास्टर शाहीन सादेह आणि पश्‍चिम बंगालचा आंतरराष्ट्रीयमास्टर अरण्यक घोष विजेते ठरले. 

सांगली : पुरोहित चेस ऍकॅडमीतर्फे आयोजित ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धांमध्ये इराणचा फिडे मास्टर शाहीन सादेह आणि पश्‍चिम बंगालचा आंतरराष्ट्रीयमास्टर अरण्यक घोष विजेते ठरले. 

फिडे मास्टर निखिल दीक्षित यांच्या वाढदिनी पुरोहित चेस अकॅडमीतर्फे आयोजित बुद्धिबळ स्पर्धेमध्ये इराणच्या शाहीन सादेह याने 96 गुणांसह विजेतेपद पटकावले. पश्‍चिम बंगालचा मानांकित सुभयान कुंदू 76 गुणांसह उपविजेता ठरला.

इराणचाच मानांकित फाहीर नवाझ अली यास 75 गुणांसह तृतीय स्थान मिळाले. तुर्कमेनिस्तानचा आंतरराष्ट्रीमास्टर सपरमिराट अताब्येव्ह यास 69 गुणांसह चौथे स्थान, दिल्लीचा फिडे मास्टर आर्यन वार्षणे यास 58 गुणांसह पाचवे स्थान मिळाले. 

आकाश कुलकर्णी क्‍लबतर्फे आयोजित ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत पश्‍चिम बंगालच्या अरण्यक घोष याने 92 गुणांसह विजेतेपद पटकावले. इराणचा फिडे मास्टर शाहीन सादेह हा 90 गुणांसह उपविजेता ठरला.

पश्‍चिम बंगालचाआंतरराष्ट्रीमास्टर मित्रभा गुहा याला 87 गुणांसह तृतीय मिळाले. इराणचा ग्रॅंडमास्टर एम. मसूद यास 74 गुणांसह चौथे स्थान मिळाले. पंजाबचा फिडे मास्टर दुष्यंत शर्माला 67 गुणांसह पाचवे स्थान प्राप्त झाले. 

पुरोहित चेस ऍकॅडमीचे प्रशिक्षक श्रेयस पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा झाली. तांत्रिक पंच म्हणून शार्दूल तपासे, दीपक वायचळ आणि सारंग पुरोहित यांनी काम पाहिले. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahin of Iran & Aranyak Ghosh of Bengal wins online chess compitations