शाहीर बापूराव जाधवांचा छत्रपती शिवरायांवरील पोवाडा गाजतोय सोशल मीडियावर

महात्माजी (बापुराव) जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्वावर गायलेल्या पोवाड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Social Media
Social Mediaeskal
Updated on

कुर्डुवाडी (सोलापूर) - समाजप्रबोधनपर गायन करणारे कुर्डुवाडी येथील महात्माजी ( बापुराव) जाधव यांनी माढा तालुका पंचायत समितीच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्वावर गायलेल्या पोवाड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ सुप्रियाताई सुळे फॅन पेज, रुपालीताई चाकणकर एफ सी, महाविकास आघाडी , गावरान वादळ यासह अनेक सोशल मीडीया पेजवर शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी पाहिला आहे.

मुळचे रणदिवेवाडी (ता माढा) येथील रहिवासी असलेले व शालेय शिक्षण न घेतलेले बापूराव यांचे वडील हे अंध व शाहिर होते. त्यांच्याकडुन शाहिरीचा वारसा मिळाला. बापुराव यांना म्हैसगाव येथील त्यांचे गुरु दगडुअण्णा यांच्याकडून कलेचे ज्ञान मिळाले. वडिलांबरोबर गायन करताना त्यांना शिकावयास मिळाले. ते समाजप्रबोधनपर कार्यक्रमाबरोबर भेदी गायन करतात. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात धार्मीक कार्यक्रम, यात्रा, दिंड्या असतील तेथे जाउन आपली कला एकटेच सादर करतात. हे गायन सादर करताना त्यांच्याकडे फक्त तुणतुणे, हातातील घुंगरू व डफ ही तीन वाद्ये असतात. तीनही वाद्ये ते स्वतःच वाजवत गायन करतात.

Social Media
Belgaum : अवकाळीने ऊस तोड मजुरांचे हाल

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील पोवाडे, पौराणिक कथा, रामायणे, कबीरांचे हिंदी दोहे, आई-वडिलांना सांभाळण्या बाबत जागरुकता करणारी काव्ये, चालु वाईट घटनांवर टिपण्णी करणारी गीते त्यांनी सादर केली आहेत़. इतर शाहीरांचे पोवाडे ते सादर करतातच त्याबरोबर स्वतः ही काव्यरचना करुन ते गायन व वादनाद्वारे सादर करतात. त्यांना पत्नी व एक छोटा मुलगा आहे. मुलाला ते शालेय शिक्षणाबरोबर भजन, किर्तन, गायन याचेही शिक्षण देउ इच्छितात.

माढा तालुका पंचायत समिती येथील एका कार्यक्रमात शाहीर जाधव यांनी हा 'असा होता शिवबा माझा माणुसकीची खाण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान...' हा पोवाडा गायला होता. त्यावेळी बांधकाम विभागातील महेश शेंडे यांनी व्हिडिओ चित्रण केले होते. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर लोकांसमोर कार्यक्रम सादर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com