मुख्यमंत्र्यांवर शाई फेकणारी युवती शिवसेनेत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या वेळी त्यांच्या ताफ्यावर शाई फेकणाऱ्या स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्ष शर्मिला येवले य शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे येवले यांनी हातामध्ये शिवबंधन बांधण्यात आले.

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. भाजपसाठी राजू शेट्टींची साथ प्रदेशाध्यक्षांनीच सोडल्यानंतर आणखी एक धक्का रविकांत तुपकर यांच्या पाठोपाठ आता स्वाभिमानीच्या युवा विभागाच्या उपाध्यक्ष शर्मिला येवले शिवसेनेत प्रवेश केला आहे. शर्मिला येवले यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या वेळी त्यांच्या ताफ्यावर शाई फेकणाऱ्या स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्ष शर्मिला येवले य शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे येवले यांनी हातामध्ये शिवबंधन बांधण्यात आले. आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या समन्वयातून येवले यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे.

अकोले येथे १३ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आली होती. सरकारचे महापोर्टल बंद करावे, महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशा विविध मागण्या करीत येवले यांनी शाईचा फुगा मुख्यमंत्र्यांचा ताफ्यामधील वाहनांच्या दिशेने फेकला होता. याप्रकरणी शर्मिला येवले यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 
शिवसेनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सत्तेमध्ये असताना सुद्धा लढा दिला आहे. त्यामुळे मी शिवसेनत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. येथून पुढेही शेतकरी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी माझा लढा सुरूच राहणार आहे. त्याचबरोबर वैभव पिचड यांच्या विरोधात तिने पत्र ही लिहिलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharmila Yewale enters Shivsena in Mumbai