esakal | गेल्या काही दिवसापासून शेवंता यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु होते.

बोलून बातमी शोधा

बेळगाव : मंत्री शशिकला जोल्ले यांना मातृशोक
बेळगाव : मंत्री शशिकला जोल्ले यांना मातृशोक
sakal_logo
By
- मकरंद पटवर्धन

निपाणी (बेळगाव) : महिला आणि बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांच्या मातोश्री श्रीमती शेवंता श्रीपती हरदारे (वय 84) यांचे मंगळवारी (13) निधन झाले. त्यांच्या मागे मंत्री जोल्ले यांच्यासह दोन मुली, जावई खासदार अण्णासाहेब जोल्ले, उद्योजक भास्कर पाटील (गडहिंग्लज), नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही दिवसापासून शेवंता यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु होते.

शेवंता यांचे माहेर हडलगा (ता. हुक्केरी) असून विवाहानंतर त्या सासरी भिवशी (ता. निपाणी) येथे आल्या. मुलगी उज्वला पाटील व जावई भास्कर पाटील यांच्यासोबत गडहिंग्लज येथे वास्तव्यास होत्या. मंगळवारी (13) दुपारी हडलगा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते.