
Farmers AI Technology : ‘‘शेतकऱ्यांना आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) शेतीत वापरायला सांगून शेतकऱ्यांना लुटू पाहत आहेत. वेगवेगळी संसाधने शेतकऱ्यांच्या गळ्यात मारून शेतकऱ्यांना कर्जबाजारी करण्याचे काम सुरू आहे. या लुटीविरोधात सांगली, कोल्हापूर, लातूर, नांदेडसह संपूर्ण राज्यभर शेतकरी संघटना जनजागरण दौरा करून शेतकऱ्यांचे प्रबोधन करणार आहे,’’ अशी माहिती अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, शिवाजीराव नांदखिले यांनी पत्रकार परिषदेत दिली.