शिराळा नगरपंचायतच्यावतीने शंभर फुट लांब व ६७ फुट रुंदीचा तिरंगा फडकवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shirala Nagar Panchayat unfurled 100 feet long and 67 feet wide tiranga

शिराळा नगरपंचायतच्यावतीने शंभर फुट लांब व ६७ फुट रुंदीचा तिरंगा फडकवला

शिराळा - शिराळा नगरपंचायतच्यावतीने "घरोघरी तिरंगा ” अंतर्गत विविध शाळांच्या तीन हजार विध्यार्थ्यानी सहभाग घेत १०० फुट लांब व ६७ फुट रुंदी असलेला भव्य तिरंगा ध्वज विद्यार्थ्यांनी डोकीवर घेत देशाच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या आठवणी जागृत करत रिमझिम पावसात डौलात व तेवढ्याच अभिमानात फडकवला. राज्यातील पहिलाच उपक्रम सांगली जिल्ह्यातील शिराळा नगरपंचायतीने राबविला आहे.

या उपक्रमांच्या सुरुवातीला शहरातील न्यू इंग्लिश स्कुल, कन्या शाळा, श्री शिव छत्रपती विद्यालय, विश्वासराव नाईक व बाबा नाईक महाविद्यालय, भारतीय विद्यानिकेतन, यशवंत बालक मंदिर, सदगुरु प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, उर्दु शाळा , जिल्हा परिषद शाळा, शिराळा तसेच शहरातील सर्व शासकीय कार्यालयांच्या सहभागाने शहरातील प्रमुख मार्गावरुन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “ घरोघरी तिरंगा ” अभियानाची जनजागृती करत सुमारे ३००० विद्यार्थ्यांच्या घोषणांच्या गजरात जगजागृती रॅलीची सुरुवात करून रॅलीचा समारोप श्री शिव छत्रपती विद्यालय मैदानात करण्यात आला.

या मैदानावर उपस्थितांना तहसिलदार गणेश शिंदे यांनी घरोघरी तिरंगा अभियानाबाबत संबोधित केले. यानंतर १०० फुट लांब व ६७ फुट रुंदी असलेला भव्य तिरंगा ध्वज विद्यार्थ्यांच्या शिरावरून देशाच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाची आठवण करुन देणा-या रिमझिम पावसात डौलात व तेवढ्याच अभिमानात फडकविण्यात आला. या फडकलेल्या राष्ट्रध्वजाला उपस्थित सर्वांनीच राष्ट्रगीताच्या गजरात सलामी देवून मानवंदना दिली.

यावेळी तहसिलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी संतोष राऊत , पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार , सहा.पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, गटशिक्षण अधिकारी प्रदिप कुडाळकर , मुखाधिकारी योगेश पाटील ,सुविधा पाटील , अर्चना गायकवाड,शरद पाटील , संजय इंगवले , लक्ष्मण मलमे, सुभाष इंगवले , सदानंद टिळे , विजय शिंदे , काजोल शिंदे , प्रीती पाटील, नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी , शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी, विद्यार्थींनी,नागरीक उपस्थित होते.

Web Title: Shirala Nagar Panchayat Unfurled 100 Feet Long And 67 Feet Wide Tiranga

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top