
शिराळा : घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन शुक्रवारी (ता. १) भरदिवसा शिराळा येथील कासार गल्ली येथे चोरट्याने तिजोरी व देव्हाऱ्यातील १३ तोळे सोने, हिऱ्याची अंगठी, चांदीचे निरंजन, ताट, करंड्यासह २२ हजार रुपये रोकड असा आठ लाख ८८ हजारांचा ऐवज चोरी केला. या बाबत सुजाता शामराव उथळे (वय ६५, कासार गल्ली) यांनी शिराळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तपासाच्या दृष्टीने वेगवेगळी पथके तयार केली आहेत.