esakal | शिराळा तालुक्‍याने कोल्हापूरचा संपर्क तोडला
sakal

बोलून बातमी शोधा

SLA20A02977.jpg

शिराळा : शिराळा तालुक्‍यातील वारणा नदीवरील मोठ्या आठ पुलावर नाकेबंदी करून तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मांगले-काखे ,चरण-सोंडोली, कोकरूड पूल वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत. 

शिराळा तालुक्‍याने कोल्हापूरचा संपर्क तोडला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

शिराळा तालुक्‍यातील मांगले-काखे, कांदे-सावर्डे, सागाव- सरूड, बिळाशी- भेडसगाव, कोकरूड-नेर्ले, चरण-सोंडोली, आरळा-शितूर, मणदूर-उखळू हे तालुक्‍यातील महत्वाचे व मोठे पूल आहेत.

या पुलामुळे शाहूवाडी व पन्हाळा तालुक्‍यातील गावाचा शिराळा तालुक्‍यातील गावांशी जवळचा संबंध असतो. शाहूवाडी तालुक्‍याच्या उत्तर भागातील गावांना बाजारपेठ, शैक्षणिक व आरोग्य सेवेसाठी शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागावर कोकरूड, शेडगेवाडी, चरण, आरळा या गावावर अवलंबून राहावे लागत आहे.

सागाव व मांगले परिसरातील लोकांचा वारणानगर,बांबवडे येथे जास्त संपर्क असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून लोकांनी विनाकारण फिरू नये असे आवाहन केले आहे.सर्वत्र त्याची अंमलबजावणी सुरू असताना काही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत.


शिराळा पोलिसांनी मांगले,कांदे, सागाव, या पुलावर तर वाकुर्डे खिंड व पाचुंब्री कराड जाणाऱ्या रस्त्यावर चेक पोस्ट केले आहेत. कोकरू पोलिसांनी बिळाशी, कोकरूड,चरण,आरळा, उखळू या पुलावर चेक पोस्ट करून वाहतूक बंद केली आहे. कराड-रत्नागिरी या रस्त्याचा मुख्य दुवा असणारा कोकरूड पूल वाहतुकीस पूर्ण बंद करण्यात आला आहे. मांगले-काखे हा पूल बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांचा गर्दीचा ओघ पूर्णतः ओसरला आहे. 

loading image