Sangli : शिवभक्ताने जपलीय शिवरायांची नाणेरुपी आठवण

नागाव कवठेच्या दुकानदाराचा छंद; हजार नाण्यांचे रोज होतेय पूजन
Sangli
Sangli sakal

सांगली - शेकडो वर्षांनंतरही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठवणी व इतिहास मराठीजनांनी स्मरणकुपीत जपण्याचा प्रयत्न केला आहे. नागाव कवठे (ता. तासगाव) येथील संतोष ऊर्फ संताजी पाटील यांनी अनोखा छंद जोपासत इतिहासप्रेम जागवले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेल्या १ हजार नाण्यांचा संग्रह त्यांनी केला आहे. शिवछत्रपतींची आठवण जपण्यासाठी या नाण्यांचे रोज पूजन केले जाते.

शिवछत्रपतींचा जाज्वल्य इतिहास मराठी माणसाला आजही स्तब्ध करतो. छत्रपतींचे गड-किल्ले हेच स्मारक समजून अनेकजण त्याची सफर करतात. तेथील माती कपाळी लावून महाराजांना अभिवादन केले जाते. शिवजयंतीच्या निमित्ताने महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अनेकविध कार्यक्रम होतात.

तासगाव तालुक्यातील नागाव कवठे गावातील संतोष पाटील हे किराणा व्यावसायिक व शेतकरी. शिवछत्रपतींच्या इतिहासाने भारावलेले मावळेच जणू! २००२ मध्ये त्यांनी किराणा मालाचे दुकान सुरू केले.

त्यावेळी चलनी नाणी व्यवहारात असल्याने त्यांच्याकडे रोज शेकडो नाणी गोळा होत. मात्र त्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेल्या नाण्याची त्यांना भुरळ पडली.

Sangli
Mumbai : पाईपलाईन मधून चालवतात 'ते' दुचाकी; कल्याण शीळ रोडवरील कोंडी टाळण्यासाठी दुचाकीस्वारांची कसरत

महाराजांची प्रतिमा असलेली जमा होतील तेवढी नाणी त्यांनी संकलित करण्याचा निश्चय केला. १९९७ ते १९९९ या काळातील छत्रपतींची नाणी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात संकलित होत गेली. पाहता-पाहता १ हजारांवर नाण्यांचा संग्रह तयार झाला.

पाटील परिवार वारकरी संप्रदायाची कास धरणारा. त्यामुळे संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा असलेली नाणी संकलनाचा त्यांना नादच लागला.

किराणा दुकानात ग्राहकांशी व्यवहार करताना संकलित झालेल्या प्रत्येक नाण्याशी त्यांचे वेगळेच नाते जडत गेले. आजमितीला त्यांच्याकडे तुकाराम महाराजांची २ रुपयांची १५०, तर ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा असलेली १ रुपयांची १५० नाणी संग्रही आहेत. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील,

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले, लेखक नामदेवराव जाधव यांच्यासह मान्यवरांनी त्यांच्या या अनोख्या छंदाबद्दल पाठीवर थाप दिली आहे. दोन दशकात त्यांना या छंदामुळे अनेक महनीय व्यक्तींना भेटता आले. मान्यवरांची शाबासकी व कौतुक दोन्ही लाभले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे कायमच आदरस्थानी राहिल्याने त्यांची नाणेरुपी स्मृती जपण्याचा निर्धार केला.वीस-एकवीस वर्षांच्या कालावधीत या संकलनासाठी अनेकांची मदत झाली.

प्रारंभी केवळ शिवरायांची नाणी संकलनाचा जडलेला छंद ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांच्या संकलनापर्यंत येऊन पोहोचला. नव्या घरात काचेच्या पेटीत ही नाणी भारताच्या नकाशाच्या आकारात लावून शेजारी अकरा गड-किल्‍ल्यांवरील माती आणून तटबंदीसारखे संग्रहित करण्याचा मानस आहे.

संतोष ऊर्फ संताजी पाटील

नाणे संग्राहक, नागाव कवठे, (ता. तासगाव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com