esakal | संभाजी भिडे गुरुजींनी आमदाराला काढायला लावला मास्क पाहा व्हिडीओ

बोलून बातमी शोधा

Shiv Pratishthan Sambhaji Bhide aalsand mask case political marathi news

शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजी भिडे यांना मात्र कोरोना ची बिल्कुल भीती वाटत नसल्याचे दिसून आले आहे.

संभाजी भिडे गुरुजींनी आमदाराला काढायला लावला मास्क पाहा व्हिडीओ

sakal_logo
By
सदाशिव पुकळे

आळसंद (सांगली) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे त्याला आवर घालण्यासाठी मास्कचा वापर करण्यावर भर देण्याचा आटापिटा सरकार करत आहे , रोज  त्याच आशयाच्या जाहिराती आपण पाहतो आहोत. सरकारने सगळीकडे मास्कचा वापर करणे अनिवार्य केले आहे , तर विना मास्क वावरणाऱ्याच्यांवर दंडात्मक कारवाई ही होत आहेत , पण शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजी भिडे यांना मात्र कोरोना ची बिल्कुल भीती वाटत नसल्याचे दिसून आले आहे.

सांगली जिल्ह्यातील आळसंद  या गावी एका भूमिपूजन कार्यक्रमा मध्ये त्यांनी स्थानिक शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना भूमिपूजन करते वेळी चक्क मास्क काढायला लावला आहे.  सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या आमदारानेच आपल्या मुख्यमंत्र्यांच्या मास्क वापरण्यासाठी केलेल्या सक्तीच्या आदेशाला 
मास्क काढून सार्वजनिक जीवनात वावरून केराची टोपली दाखवली आहे. तर  भिडे गुरुजीना आपल्या दैवता समान मानणा-याना , गुरुजींची ही कृती पाहून आश्चर्य वाटत आहे.

हेही वाचा- अवघ्या तासाभरातच  महापौर, उपमहापौर कार्यालयातील फोटो गायशिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी खानापूर आटपाडी चे आमदार अनिल बाबर यांना कार्यक्रमाच्यावेळी मास्क काढायला लावला. शासन मास्क वापरा अन्यथा दंड करू कारवाई करू असे म्हणत असताना ज्यांची राज्यांमध्ये सत्ता आहे त्याच पक्षाचे आमदार मास्क काढून कार्यक्रम करीत आहे.
संपादन- अर्चना बनगे