esakal | व्हिडिओ : उद्धवसाहेब त्यांचा बंदोबस्त करा..! 
sakal

बोलून बातमी शोधा

sambhaji bhide

सांगली : शिवसेनेला विरोध नाही, पण छत्रपती उदयनराजे यांच्याबद्दल संजय राऊत यांनी अनुद्गार काढून अपमान केला आहे. उद्धवसाहेब संजय राऊत यांन तत्काळ पदावरून मुक्त करा, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी केले आहे. 

व्हिडिओ : उद्धवसाहेब त्यांचा बंदोबस्त करा..! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : शिवसेनेला विरोध नाही, पण छत्रपती उदयनराजे यांच्याबद्दल संजय राऊत यांनी अनुद्गार काढून अपमान केला आहे. उद्धवसाहेब संजय राऊत यांन तत्काळ पदावरून मुक्त करा, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी केले आहे. 

श्री शिवछत्रपतींचे 13 वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निंदनीय वक्तव्य करणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा निषेध करण्यासाठी शिवप्रतिष्ठानने आज जिल्हा बंद केला आहे. श्री. भिडे म्हणाले,""हा अपमान केवळ छत्रपती उदयनराजे यांचा नसून संबंध देशाला प्राणभूत असलेल्या छत्रपती परंपरेचा हा अपमान आहे, असे आम्ही मानतो. त्यामुळे राऊत यांच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यात गाव पातळीपर्यंत कडकडीत बंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणे चुकीचे आहे. तमाम देशाचे आदरस्थान असणाऱ्या महाराजांची तुलना कुणी करू नये.'' 

खासदार राऊत यांनी छत्रपती उदनराजे भोसले यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचे आज सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवप्रतिष्ठानने देखील खासदार राऊत यांचा निषेध केला आहे. तसेच त्यांच्या निषेधार्थ संपूर्ण सांगली जिल्हा बंद ठेवण्यात आली आहे. सांगलीतील मारूती चौकात सकाळी दहा वाजता सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन निदर्शने करण्यात आली. सांगलीतील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मारूती चौकात मोठा पोलिस बंदोबस्त होता.