मिरजेतील शिवसैनिक मुंबईत दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena

मिरजेतील शिवसैनिक मुंबईत दाखल

मिरज : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत ३९ आमदारांसह गुवाहाटीमध्ये जाऊन ठाकरे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींत राज्यातील शिवसैनिकांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी थेट मुंबई गाठली आहे. मिरजेतील शहराध्यक्षांसह तालुकाध्यक्ष मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे.

त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, प्रवक्ते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत असल्याचे सांगितले आहे. काल शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदा पवार यांनी शिंदे गटास पाठिंबा देत असल्याचे सांगितल्यानंतर दुसरे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाठीशी जिल्ह्यातील शिवसैनिक असल्याचे सांगितले आहे. ते काल मुंबई येथील शिवसेनेकडून तातडीने बोलावलेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीस उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांचा पाठिंबा असल्याची ग्वाही दिली आहे.

आज (ता. २५) सांगली, मिरजेतील प्रमुख शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना होत सेना खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला. यामध्ये जिल्हा उपप्रमुख महादेव मगदूम, सांगली शहरप्रमुख मयूर घोडके, मिरज शहराप्रमुख चंद्रकांत मैगुर, तालुकाप्रमुख संजय काटे, मिरज विधानसभा क्षेत्राप्रमुख तानाजी सातपुते आदी पदाधिकारी मुंबई येथे शिवसेना भवनवर गेले आहेत.

Web Title: Shiv Sainiks From Miraj Enter Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top