
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे पाच सदस्य आहेत. पाच पैकी चार सदस्य करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थक आहेत. या चारही सदस्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत भाजप व समविचारीची साथ घेत अध्यक्षपद आपल्याकडे घेतले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिवसेना सदस्य अमर पाटील हे कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहिले आहेत. उपाध्यक्ष निवडीत करमाळ्याचे शिवसेना सदस्य नीलकंठ देशमुख यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळराजे पाटील यांना मतदान केले आहे. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य भाजपसोबत आहेत आणि शिवसेनेचे नेतेच आपल्यासोबत आहेत ही बाब कॉंग्रेस-राष्ट्रवादी व शेकापच्या पक्की लक्षात आल्यानंतर त्यांनी आजच्या बैठकीपासून शिवसेना नेत्यांना बाजूलाच ठेवले आहे.
हेही वाचा - भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी "उदंड झाले इच्छुक'
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पराभव झाल्यानंतर आज पहिलीच बैठक आज दुपारी सोलापुरातील राष्ट्रवादी भवनात झाली आहे. 14 जानेवारी रोजी होणाऱ्या विषय समिती सभापतीच्या निवडीची प्राथमिक रणनीती या बैठकीत ठरविण्यात आली आहे. चार समित्यांपैकी राष्ट्रवादी दोन समित्या, कॉंग्रेस व शेकाप प्रत्येकी एक समिती लढणार असल्याचे या बैठकीत ठरले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत पराभव कोणामुळे व का झाला? यावर बराच काथ्याकूट झाल्याचीही खुमासदार चर्चा राष्ट्रवादीत रंगली आहे. आमदार भारत भालके, माजी आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्यात ही आजची बैठक झाली.
हेही वाचा - सेना मंत्री अन् एसपींचं जमलं
आमच्यासाठी लढणे महत्त्वाचे...
आम्ही जय पराजयाला फारसे महत्त्व देत नाही. आमच्यासाठी लढणे हे महत्त्वाचे आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत आमचा पराभव झाला, सभापती निवडीत आमचा पराभव होऊ शकतो हे समोर असताना देखील आम्ही विषय समित्यांच्या चारही जागा लढणार असल्याचे ठरले असल्याची माहिती मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी दिली. सभापती निवडीसाठी आज कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शेकापची प्राथमिक बैठक झाली. पुढची बैठक रविवारी होण्याची शक्यता असल्याचेही राजन पाटील यांनी सांगितले.
उमेदवार देणार उपमुख्यमंत्री पवार
जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या दोन जागा लढणार असून या दोन्ही जागेवर कोण उमेदवार असणार? याचा निर्णय हा उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत. शेकापच्या वाट्याला येणाऱ्या एका समितीचा उमेदवार कोण असावा याचा निर्णय सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख घेणार आहेत. कॉंग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या एका समितीचा उमेदवार कोण असावा? याचा निर्णय अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे घेणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.