

Shiv Sena–NCP leaders celebrate victory
sakal
आटपाडी : शिवसेनेला माप भरायला ओंजळ कमी पडते, याची जाणीव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन त्यांनाच करगणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देऊन भाजपचा गड सर करण्याची स्वप्नपूर्ती केली. भाजप नेतृत्वाने काही गावांना गृहीत धरून जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याची किंमत पराभवातून मोजावी लागली.