esakal | संजय राऊत जरा जपून : शिवेंद्रसिंहराजे
sakal

बोलून बातमी शोधा

संजय राऊत जरा जपून : शिवेंद्रसिंहराजे

माजी खासदार उदयनराजे भाेसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संजय राऊत यांनी त्यांची भाषा जपून बाेलावी असा इशारा दिला. आज (बुधवार) खासदार संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांबाबत पूरावे मागितले. त्यास आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत जरा जपून : शिवेंद्रसिंहराजे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : त्यांना काय पूरावा द्यायचा आहे. राऊत साहेबांनीच सांगावे काय पूरावा द्यायचा आहे. अख्या महाराष्ट्राला माहित आहे मी काेणत्या घरात जन्मलाे आहे. राऊत यांनी आपली भाषा जपून वापरावी अशी प्रतिक्रिया आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी माध्यमांशी बाेलताना दिली.

हेही वाचा - छत्रपती घराण्यावर टीका खपवून घेणार नाही ; समर्थक कडाडले...  

मायणी (जि. सातारा) येथील एका कार्यक्रमास आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले उपस्थित हाेते. तेथे त्यांना माध्यमांनी गाठले. खासदार संजय राऊत हे शिवछत्रपती घराण्यात जन्मलेले पूरावे मागत आहेत असा प्रश्न पत्रकारांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांना केला. त्यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले त्यांना काय पूरावा द्यायचा आहे. राऊत साहेबांनीच सांगावे काय पूरावा द्यायचा आहे. अख्या महाराष्ट्राला माहित आहे मी काेणत्या घरात जन्मलाे आहे.

नक्की वाचा -  Video : जाणता राजा ही शिवछत्रपतींची उपाधी नव्हेच : शरद पवार 

संजय राऊत यांचा अतिरेक हाेत आहे असे तुम्हांला वाटते का या प्रश्‍नावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले हो, ते खासदार आहेत. पत्रकार आहेत. त्यांनी त्यांची भाषा जपून वापरावी. टीका टिप्पणी तर सुरुच असते. आम्ही तर काय वाईट किंवा कोणाबद्दल अपशब्द वापरलेला नाही. त्यांनी पण ते ठेवावे एवढीच अपेक्षा आहे.

हेही वाचा - शिवसेना स्थापनेवेळी वंशजांना विचारले होते का? : उदयनराजे