esakal | छत्रपती घराण्यावर टीका खपवून घेणार नाही ; समर्थक कडाडले...
sakal

बोलून बातमी शोधा

not tolerate criticism on Chhatrapati family say chhatrapati sambhaji raje

झोपेतून उठलेल्या खासदार संजय राऊत यांना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेली भूमिका दिसली नाही काय, असा सवाल खासदार संभाजीराजे यांचे समर्थक योगेश केदार यांनी आज पत्रकार परिषदेत केला. छत्रपती घराण्यावर टीका सहन केली जाणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला. 

छत्रपती घराण्यावर टीका खपवून घेणार नाही ; समर्थक कडाडले...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  ः झोपेतून उठलेल्या खासदार संजय राऊत यांना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेली भूमिका दिसली नाही काय, असा सवाल खासदार संभाजीराजे यांचे समर्थक योगेश केदार यांनी आज पत्रकार परिषदेत केला. छत्रपती घराण्यावर टीका सहन केली जाणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला. 

"आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरून देशभर संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत. याबाबत राऊत यांनी संभाजीराजेंवर टीका केली होती. याला आज प्रत्युत्तर म्हणून संभाजीराजेंचे समर्थक केदार यांनी पत्रकार परिषद घेतली. 

हे पण वाचा -  रायगडावर येऊन महाराष्ट्राची माफी मागा ; कोल्हापूरात शिवप्रेमी भडकले

ते म्हणाले, ""दिल्लीमध्ये भाजप नेत्यांनी "आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पुस्तक प्रकाशित केले. यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिवाजी महाराजांच्या तुलनेतील पुस्तकावर राऊत यांनी ट्‌विट करून भूमिका मांडण्यापूर्वीच खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका सिंदखेडराजा येथे मांडली होती. मात्र झोपेतून उठून ट्‌वीट केलेल्या राऊत यांना ती दिसली नाही. राऊत यांनी महाभारतातल्या संजय सारखे सर्वज्ञ आहे असे वागू नये. त्यांच्यासह कोणीही छत्रपती घराणाऱ्यावर टीका करत असतील तर खपवून घेतली जाणार नाही. संभाजीराजे यांच्या अकाऊंटवरून एकेरी भाषेत केलेले ट्विट हे राजेंचेच आहे.'' 
पत्रकार परिषदेस फत्तेसिंह सावंत, उदय घोरपडे, संजय पवार, सोमनाथ लांबोरे, शैलेश गवळी, भरत कांबळे आदी उपस्थित होते. 

हे पण वाचा - गोयल यांच्या फोटोला कोल्हापुरी चपलांचा मार


देशभर संताप 
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी पुस्तकाच्या माध्यमातून केल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. खासदार संभाजीराजे यांनी या पुस्तकाबाबत आपला राग व्यक्त केला होता. तरीही राऊत यांनी ट्‌वीट करून संभाजीराजेंवर निशाणा ठेवला होता. खासदार राऊत यांच्या प्रतिक्रियेवर केदार यांनी सवाल उठवत राऊत यांनी माहिती घेऊन बोलावं. आपण काय महाभारतातील संजय नाही हे लक्षात घ्यावे, असेही केदार यांनी स्पष्ट केले.