esakal | पालिका क्षेत्रात शिवेंद्रसिंहराजेंना ' येथून ' झाले कमी मतदान
sakal

बोलून बातमी शोधा

Shivendrasinghraje bhosale

दोन्ही नेत्यांच्या निर्णयामुळे शहरातील शरद पवार यांचे नेतृत्व मानणारे खट्ट झाले. परिणामी त्याचा फटका दोन्ही नेत्यांना त्यांच्या मतांमध्ये दिसला आहे.

पालिका क्षेत्रात शिवेंद्रसिंहराजेंना ' येथून ' झाले कमी मतदान

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांना नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत सातारा विधानसभा मतदारसंघात मतदारांनी भरभरुन मते दिली. दोन्ही राजेंची ताकदीचा एकमेकांना फायदा झाला.
सातारा पालिका क्षेत्रातील काही भागात शिवेंद्रसिंहराजेंना आणि विरोधी उमेदवार दीपक पवार यांना समसमान मते दिली आहेत, तर काही भागात शिवेंद्रसिंहराजेंना शेकडो मतांचा फटका देखील बसला आहे.

"राष्ट्रवादी' ला सोडचिठ्ठी देऊन दोन्ही नेत्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दोन्ही नेत्यांच्या निर्णयामुळे शहरातील शरद पवार यांचे नेतृत्व मानणारे खट्ट झाले. परिणामी त्याचा फटका दोन्ही नेत्यांना त्यांच्या मतांमध्ये दिसला आहे.
सातारा विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रसिंहराजेंना एक लाख 18 हजार पाच मते मिळाली आहेत. यामध्ये सातारा पालिका क्षेत्रातील सुमारे 31 हजार 979 मतांचा समावेश आहे. 

सदरबझार येथील जयजवान प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक 278 येथे एकूण 388 मतदान झाले आहे. येथे दीपक पवार आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना समान 181 मते मिळाली आहेत. याबरोबरच अशोक दिक्षीत यांना 13, अभिजीत बिचुकलेंना चार, शिवाजी भोसलेंना दोन तसेच नोटास सात मते मिळाली आहेत.
 

बुधवार पेठेतील ज्ञानदीप विद्यामंदिर पालिका शाळेत केंद्र क्रमांक 259, 260 तसेच 261 येथे एकूण 2112 मतदान झाले आहे. यामध्ये दीपक पवार यांना 1230 मते तसेच विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना 823 मते मिळाली आहेत. येथे अशोक दिक्षीत यांना 32 तसेच नोटाला 17 मते आहेत. या ठिकाणी शिवेंद्रसिंहराजेंना तब्बल 407 मतांचा फटका बसला आहे.
 

मल्हार पेठेतील पालिका नूतन मराठी शाळा पश्‍चिमकडील खोली क्रमांक एक मतदान केंद्र क्रमांक 313 येथे एकूण 747 मतदान झाले आहे. येथे दीपक पवार यांना 377 मते, आमदार शिवेंद्रसिंहराजेंना 346 मते मिळाली आहेत. येथे अशोक दिक्षीत यांना नऊ, अभिजीत बिचुकलेंना पाच, शिवाजी भोसलेंना दोन तसेच नोटाला 07 मते आहेत. या ठिकाणी शिवेंद्रसिंहराजेंना 31 मते कमी आहेत. 

मल्हार पेठेतील पालिका नूतन मराठी शाळा दक्षिणेकडील खोली क्रमांक एक मतदान केंद्र क्रमांक 334 येथे एकूण 722 मतदान झाले. यामध्ये दीपक पवार यांना 358 मते, आमदार शिवेंद्रसिंहराजेंना 329 मते मिळाली आहेत. येथे अशोक दिक्षीत यांना 18, अभिजीत बिचुकलेंना पाच तसेच नोटाला 09 मते आहेत. या ठिकाणी शिवेंद्रसिंहराजेंना 29 मते कमी आहेत.

मल्हार पेठेतीलच भवानी विद्यामंदीर येथील मतदान केंद्र क्रमांक 335, 336, 337 येथे एकूण 1906 मतदान झाले आहे. यामध्ये दीपक पवार यांना 1171 मते, आमदार शिवेंद्रसिंहराजेंना 684 मते मिळाली आहेत. येथे अशोक दिक्षीत यांना 27, अभिजीत बिचुकलेंना पाच तसेच नोटाला 12 मते आहेत. या ठिकाणी शिवेंद्रसिंहराजेंना 487 मतांचा फटका बसला आहे. 
 
शिवेंद्रसिंहराजेंनी गड राखला मात्र...

पालिका मंगल कार्यालय केंद्र क्रमांक एक मतदान केंद्र क्रमांक 292 येथे एकूण 693 मतदान झाले. यामध्ये दीपक पवार यांना 348 मते तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजेंना 313 मते मिळाली आहेत. येथे अशोक दिक्षीत यांना 20, अभिजीत बिचुकलेंना चार, तसेच नोटाला 06 मते आहेत. येथे शिवेंद्रसिंहराजेंना 35 मते कमी मिळाली आहेत.


मंगळवार पेठेतील बापूसाहेब चिपळणुकर शाळा (शहाणे बोळ) येथील मतदान केंद्र क्रमांक 253 येथे एकूण 787 मतदान झाले आहे. यामध्ये दीपक पवार यांना 378 मते, आमदार शिवेंद्रसिंहराजेंना 389 मते मिळाली आहेत. येथे अशोक दिक्षीत यांना 05, अभिजीत बिचुकलेंना दोन, तसेच नोटाला 11 मते आहेत. या ठिकाणी शिवेंद्रसिंहराजेंना केवळ 11 मते जास्त आहेत.
 
शाहूनगर येथील सह्याद्री माध्यमिक विद्यालय येथील मतदान केंद्र क्रमांक 338, 339, 340 येथे एकूण 1098 मतदान झाले आहे. यामध्ये दीपक पवार यांना 521 मते तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजेंना 534 मते मिळाली आहेत. येथे शिवेंद्रसिंहराजेंना 13 मतेच जादा मिळाली आहेत.

आमच्या वहिनीसाहेबांची माेहिम फत्ते...