esakal | मावळ्यांच्या गर्जनेने दुमदुणार किल्ले प्रतापगड
sakal

बोलून बातमी शोधा

मावळ्यांच्या गर्जनेने दुमदुणार किल्ले प्रतापगड

मुख्य मिरवणुकीत शिवचरित्रातील प्रसंगावर आधारित चित्ररथ काढण्यात येणार आहे. तसेच पारंपरिक गजी नृत्य, झांजपथक, लेझीम पथक व हलगी वादक, घोडेस्वार मावळे यांची पथके. याशिवाय शिवाजी उदय मंडळाची पालखी हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण असणार आहे. 

मावळ्यांच्या गर्जनेने दुमदुणार किल्ले प्रतापगड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीसाठी शाहूनगरी सज्ज झाली आहे. शिवजयंतीनिमित्त उद्या (ता. 19) व गुरुवारी (ता. 20) पालिकेच्या वतीने भव्य मिरवणूक, शोभायात्रा, पोवाडे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेनेही प्रतापगडावर शिवजयंती उत्सव साजरा करण्याची तयारी केली आहे. 

शाहूनगरीमध्ये शिवजयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या वर्षीही मोठ्या उत्साहाने पालिका व शिवजयंती मंडळांनी तयार केली आहे. अजिंक्‍यतारा किल्ला, राजवाडा, कमानी हौद, पोवई नाक्‍यावरील शिवरायांचा पुतळा, नगरपरिषद कार्यालय अशा ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शहरामध्ये ठिकठिकाणी आकर्षक कमानी उभारण्यात येत आहेत. शिवजयंती मंडळांनी विविध प्रकारच्या देखाव्यांची तयारी केलेली आहे. त्याचबरोबर शाळा-शाळांमध्येही शिवजयंतीचे नियोजन करण्यात आले आहे. उद्या (बुधवार) नगरपरिषद कार्यालयात सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर पोवई नाक्‍यावरील शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालिकेच्या वतीने अभिवादन केले जाणार आहे. सायंकाळी साडेचार वाजता गांधी मैदानावर शिवशाहीर शिवम भूतकर यांचा पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे. साडेपाच वाजता गांधी मैदानावरून शिवजयंतीच्या भव्य मिरवणुकीचा प्रारंभ होणार आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी शिवचरित्रातील प्रसंगावर आधारित चित्ररथ यात्रा काढण्यात येणार आहे. तसेच पारंपरिक गजी नृत्य, झांजपथक, लेझीम पथक व हलगी वादक, घोडेस्वार मावळे यांची पथके. याशिवाय शिवाजी उदय मंडळाची पालखी हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण असणार आहे. 
गुरुवारी (ता. 20) सकाळी साडेअकरा वाजता पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात 2018-19 या वर्षात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता गांधी मैदानावर राष्ट्रपती पदक विजेते शिवशाहीर बजरंग आंबी व त्यांचे सुपुत्र अमाघराज आंबी यांच्या पोवाड्याचा "सिंह गरजला सह्याद्री'चा हा कार्यक्रम होणार आहे. शहरातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम व उपाध्यक्ष किशोर शिंदे यांनी केले आहे. 

वाचा : चर्चा तर हाेणारच...सातारा पालिकेची चर्चाच चर्चाच

हेही वाचा : ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे दर्शनप्रतापगडावर जिल्हा परिषदेतर्फे कार्यक्रम 

जिल्हा परिषदेनेही शिवजयंतीची जोरदार तयारी केली आहे. प्रतापगडावर हा उत्सव साजरा केला जाणार आहे. सकाळी साडेसहा वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले सपत्नीक भवानी मातेची पूजा करणार आहेत. त्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, इतर अधिकारी, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सर्व सभापती उपस्थित राहणार आहेत. पूजेनंतर ध्वजवंदन होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी शिवचरित्रावर आधारित पोवाड्यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यात जिल्हा परिषद शाळांतर्गत घेण्यात आलेल्या पोवाडा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण केले जाणार आहे. त्यानंतर शिवचरित्रावर व्याख्यानाही होणार आहे.