
Cow Smugglers Sangli : ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ या पवित्र गीतांना विरोध करणारे, गोतस्करांचे सूत्रधार असणाऱ्या आमदार इद्रिस नायकवडी यांना ‘मोका’ लावावा. स्वतःच्या कत्तलखान्यातून गोहत्येचे पाप करणाऱ्या नायकवडींना गोरक्षकांवर बोलण्याचा अधिकार नाही. स्वतःची काळी कृत्ये लपवण्यासाठी इतरांवर बेछूट आरोप करणारेच गोतस्करांचे दलाल असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठानचे संघटक हणमंत पवार यांनी पत्रकार बैठकीत केला. आमदार सदाभाऊ खोत यांनी दोन दिवसांपूर्वी गोरक्षकांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेचा प्रतिष्ठानतर्फे निषेध करण्यात आला.