शिवसमर्थची मुख्यमंत्री सहायत्ता निधीला लाखाची मदत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

मुख्यमंत्री  सहाय्यता निधीस मदत करणारी देणगी १०० टक्के करसवलत मिळणार आहे. जास्तीत जास्त समाजातील तसेच उद्योग व्यवसाय क्षेत्रातील दानशूर व्यक्तीनि मदतीचा धनादेश वरील माहितिद्वारे सुपूर्द करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
 

मल्हारपेठ  (जि.सातारा) : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाला मुकाबला करण्यासाठी तळमावलेच्या शिवसमर्थ मल्टिस्टेट को ओपरेटिव्ह  संस्थेकडुन मुख्यमंत्री सहायत्तानिधिसाठी एक लाख रूपयाच्या मदतीचा धनादेश पाटणचे प्रांताधिकारी  श्रिरंग तांबे आणी तहसीलदार समिर यादव याना संस्थेचे संस्थापक जनार्दन बोत्रे यांनी  सुपूर्द केला.

कोरोना सदृष्य महामारीचा सामना करण्यासाठी राज्य शासनाला आपलाही हातभार लागावा म्हणून आमदार खासदारांपासुन ते मोठमोठया उद्योगपतिसह चित्रपट सृष्ठितील कलाकारानीही मदतीचा ओघ सुरु केला आहे .

पाटण तालुक्यातहि अल्पावधित सहकार क्षेत्रातून जनसामान्यांच्या मदतीला धावून जाणारी तळमावले (ता पाटण) येथील श्री शिवसमर्थ मल्टीस्टेट को. आॅपरेटीव्ह. पत संस्थाही मदतीला धावून आली आहे. पाटण तालुक्यातील  पहिला एक लाख रुपये  मदतीचा धनादेश  संस्थेचे संस्थापक अॅड जनार्दन बोत्रे यांनी पाटण येथे स्वत जाऊन पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे  आणि  तहसीलदार समिर यादव याना सुपूर्द करणेत आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी तथा पाटणचे  अशोक थोरात, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मिना साळुंखे तालुका वैद्यकीय अधिकारी आर.बी.पाटील  उपस्थित होते. 

मुदतबाह्य हॅण्डवॉशवर पोलिसांचा छापा

कऱ्हाड : वापरायची मुदत संपल्यानंतरही हॅण्डवॉश विकल्या जाणाऱ्या एका ठिकाणी छापा टाकुन पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव यांच्या पथकाने मोठा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी अचानक केलेल्या कारवाईने अशा मुदतबाह्य विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शहरात
अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच अशी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी रात्री उशीरा गु्न्हा दाखल होईल, असे पोलिसांनी सांगितले.

लॉकडाऊनचे धडे (श्रीराम पवार)

पोलिसांची माहिती अशी ः कऱ्हाड शहरात एका ठिकाणी मुदतबाह्य हॅण्डवॉश विक्री केली जात असल्याची माहिती पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव यांना मिळाला होती. त्यांनी संबंधित ठिकाणची खातरजमा करुन सहकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तेथे मुदत संपलेल्या हॅण्डवॉशचा साठा आढळुन आला. संबंधित हॅण्डवॉशचे बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिस उपाधिक्षक गुरव, पोलिस उपनिरीक्षक एस. डी. शेलार, राजु डांगे, हवालदार प्रविण पवार, सागर बर्गे, आसीफ जमादार, संतोष चव्हाण, अतुल देशमुख, सुधीर जाधव, सचीन गुरव, सौरभ कांबळे यांनी ही कारवाई केली. शहरात अचानक टाकण्यात आलेल्या या छाप्यामुळे अशा अवैधरित्या मुदतबाह्य हॅण्डवॉश विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान संबंधित विक्रेत्याकडुन काही ग्रामपंचायतीसह कोल्हापुर जिल्ह्यातील एकाला संबंधित हॅण्डवॉश विकल्याचे समजल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्यांना विकले आहेत त्यांची माहिती घेवुन तो हॅण्डवॉशचा साठा जप्त करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. शहरात अनेक वर्षानंतर अशी कारवाई झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.  

Coronavirus : पुणे विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 104

मुंबईपर्यंत लिंक असण्याची शक्यता

पोलिसांनी छापा टाकुन जप्त केलेले हॅण्डवॉश हे 2013 साली तयार करण्यात आले आहे. त्याची मुदत 2016 साली संपली आहे. मात्र त्यावर कागद चिटकवुन त्याची मुदत वाढवुन आणि किंमत बदलुन ते हॅण्डवॉश बाजारात पुन्हा विकण्यात आल्याचे कारवाईत समोर येत आहे. त्याची खातरजमा करुन पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान हे सर्व करण्यामध्ये मुंबईपर्यंत लिंक असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असुन त्यादृष्टीने तपास सुरु आहे.
 

ज्यांनी हे हॅण्डवॉश खरेदी केले आहेत, किंवा ते कोणाला मिळाले आहेत, त्यांनी त्याची मुदत कधी संपणार आहे. त्याची खातरजमा करुन घ्यावी. मुदत संपलेले हॅण्डवॉश वापरु नये.

सुरज गुरव, पोलिस उपाधिक्षक, कऱ्हाड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsamarth Multistate Cooperative Donated Lakh Ruppees To Chief Minister Relif Fund