Coronavirus : पुणे विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 104

Corona-Patient
Corona-Patient

पुणे : पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 104 इतकी झाली असून, त्यात पुणे जिल्ह्यात 74, सातारा 3, सांगली 25 आणि कोल्हापूर जिल्हयात दोन रुग्ण आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी (ता.४) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना संशयित रुग्णांचे 2 हजार 265 नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 2 हजार 58 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, 207 नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. प्राप्त अहवालांपैकी 1 हजार 915 नमुने निगेटीव्ह आहेत, तर 104 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 19 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयामधून सोडण्यात आले आहे.

पुणे विभागामधील 8 हजार 615 प्रवाशांपैकी 3 हजार 977 प्रवाशांबाबत पाठपुरावा सुरू असून 4 हजार 638 प्रवाशांबाबत पाठपुरावा पूर्ण झाला आहे. आजपर्यंत 16 लाख 33 हजार 970 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्याअंतर्गत 75 लाख 75 हजार 490 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 542  व्यक्तींना अधिक तपासणीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

विभागामध्ये सद्यस्थितीत एकूण 88 ‍ठिकाणी क्वॉरंटाईन‍ सुविधा निर्माण करण्यात आली आहे. या ठिकाणी 12 हजार 850 बेड्स उपलब्ध आहेत. तसेच, 52 ‍ठिकाणी आयसोलेशन सुविधा निर्माण करण्यात आली असून या ठिकाणी 2 हजार 167 बेड्स उपलब्ध आहेत. 

पुणे विभागात 1 हजार 465  व्हेंटीलेटर्स : 

सरकारी रुग्णालयात 137 व्हेंटीलेटर्स आणि खासगी रुग्णालयात 1 हजार 328 व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 895 व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. सद्यस्थितीत एकूण N-95 मास्क- 53,640, ट्रीपल लेअर मास्क- 2 लाख 64 हजार 429 उपलब्ध आहेत. 

अन्नधान्य, भाजीपाला, दुधाचा पुरेसा साठा

पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात 23 हजार 411 टन धान्यसाठा उपलब्ध आहे. पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत 27 लाख 8 हजार 711 शिधापत्रिकाधारक कुटुंबापैकी आतापर्यंत 9 लाख 4 हजार 604 कुटुंबांना गहू, साखर, तूरडाळ, चणाडाळ व तांदळाचे 2 लाख 18 हजार 621 क्विंटल धान्य वितरण करण्यात आले आहे.

मार्केटमध्ये विभागात 28 हजार 936 क्विंटल अन्नधान्याची आवक झाली आहे. भाजीपाल्याची आवक 9 हजार 901 क्विंटल, फळांची आवक 4 हजार 431 क्विंटल तसेच कांदा/ बटाट्याची 9 हजार 168 क्विंटल इतकी आवक झाली आहे, अशी माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागातील स्थिती : 
-  88 ‍ठिकाणी क्वॉरंटाईन‍ सुविधा
-  12 हजार 850 बेड्स उपलब्ध
-  52 ‍ठिकाणी आयसोलेशन सुविधा
-  16 लाख 33 हजार 970 घरांचे सर्वेक्षण  
-  75 लाख 75 हजार 490 व्यक्तींची तपासणी
- शासकीय गोदामात 23 हजार 411 टन धान्यसाठा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com