शिवसेना आमदाराच्या कार्यालयावर नगरपालिकेचा बुलडोझर : Sangli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

शिवसेना आमदाराच्या कार्यालयावर नगरपालिकेचा बुलडोझर

विटा (सांगली) : शिवसेनेचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांच्या नेतृत्वाखालील खानापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या विटा (Vita)येथील जुन्या इमारतीवर विटा नगरपालिकेने बुलडोझर चालवला आहे. ही इमारत जुनी असून ती धोकादायक आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे येथील मुख्याधिकारी विवेक नरवाडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

या पालिकेवर राष्ट्रवादीचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची सत्ता आहे. बाबर-पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष जुना आहे, मात्र ही कारवाई केवळ आणि केवळ लोकांच्या जीविताला धोका होऊ नये, या हेतूने करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा: निपाणी - मुरगूड रोडवर अपघातात सोनगेचा तरुण जागीच ठार

विट्यातील साळसिंगे रस्त्यावर खानापूर तालुका खरेदी विक्री संघाची इमारत आहे. ही इमारत जुनी आहे. याआधी विट्यात एका जुन्या इमारतीचा अपघात झाला. ती पडली. त्यात एकजण गंभीर जखमी झाला आणि एका महिलेचा मृत्यू झाला. याबाबतचा आढावा घेत असताना आयएएस अधिकारी असेलेले प्रभारी मुख्याधिकारी विशाल नरवाडे यांनी माहिती घेतली. त्यात अनेक इमारती धोकादायक असल्याचे आढळले. या संस्थेलाही तीनवेळा नोटीस बजावल्या. त्यांनी इमारत पाडून घेतो, असे सांगितले होते, मात्र ते झाले नाही. त्यामुळे कारवाई करावी लागल्याचे नरवाडे यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top