शिवसैनींकांच्या मदतीने केला वडिलांचा अंत्यविधी 

shivsena supporters help Father's funeral corona virus
shivsena supporters help Father's funeral corona virus

बेळगाव : वडिलांचे निमोनियामुळे निधन झाले. परंतु, अंत्यविधी कोठे करावा या विवंचनेत सापडलेल्या मुलाच्या मदतीला पुणे येथील शिवसैनिक धावले आणि लॉकडाऊन असतानाही पुणे येथून बेळगावला मृतदेह आणणे शक्य झाले. संकटावेळी अनेकांनी हातवर केलेले असतानाही शिवसैनिकांनी कार्यतत्परता दाखविल्याने रामशिश देवनंदन शहा या उद्योजकावर बेळगाव येथे अंत्यसंस्कार करता आले. 

शहा यांचा मुलगा हिंजवडी येथे नोकरीनिमित्त राहतो. त्यामुळे मुलाकडे गेलेल्या बेळगाव येथील भाग्यनगर दुसरा क्रॉसमधील उद्योजक रामशिश देवनंदन शहा यांचे सोमवारी पुणे येथील ससुन रुग्नालयात निमोनियाने निधन झाले. मात्र लॉकडाऊन असल्याने मृतदेह घरी कसा घेऊन जायचा या चिंचेत असलेल्या मुलाला व त्याच्या आईला काहीही समजत नव्हते. कारण संचारबंदीमुळे सर्व नातेवाईक व मित्र मंडळी पुण्याला येऊ शकत नव्हते. तसेच बेळगावला मृतदेह घेऊन जाण्यासाठी वाहन व इतर प्रकारची अडचण येत होती. त्यामुळे त्यांच्या मुलाने चिंदबरनगर येथील शिवसैनिक अरुण गावडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर गावडे व शहा यांच्या नातेवाईकांनी अनेक राजकिय पक्षांच्या नेते मंडळीना संपर्क साधला, पण संचारबंदी असल्यामुळे काहीच करु शकत नाही असे सांगत त्यांनी हात वर केले. मात्र ही गोष्ट बेळगाव सीमाभाग शिवसेना संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांना समजताच नागनुरी यांनी मुंबई येथील शिवसेना भवन येथे संपर्क साधला. त्यानंतर पुणे येथील नगरसेवक प्रमोद भानगिरे यांना मदत करण्यास सांगण्यात आले. 
भानगिरे यांनी ससुन रुग्णालयात जाऊन माहिती घेत रुग्नवाहीका उपलब्ध करुन दिली व राष्ट्रीय महामार्गावर कोणीही अडवू नये यासाठी पोलीसांशी संपर्क साधला. त्यामुळे मंगळवारी बेळगावात शहा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत शहा गुजराती समाज बांधवांनी शिवसेनेच्या कार्याबाबत समाधान व्यक्‍त केले असून अशा प्रकारची वेळ कोणवरही येऊ नये असे मत व्यक्‍त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com