बाबासाहेब पुरंदरेंनी घेतले होते `मंगसुळीच्या खंडोबा`चे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाबासाहेब पुरंदरेंनी घेतले होते `मंगसुळीच्या खंडोबा`चे दर्शन

बाबासाहेब पुरंदरेंनी घेतले होते `मंगसुळीच्या खंडोबा`चे दर्शन

sakal_logo
By
रंगनाथ देशिंगकर

उगार खुर्द : शिवचरित्रकार, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांनी उगार, मंगसुळी भागात विविध कार्यक्रमासाठी आलेल्या स्मृतींना उजाळा मिळाला.

हेही वाचा: भाजपने पैसे वाटले, दंगलीचं रचलं सुनियोजित षडयंत्र - नवाब मलिक

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे 17 ते 19 जुलै 1990 अखेर उगार खुर्दला शिवचरित्रावर व्याख्यान देण्यास आले होते. त्यांची ही पहिलीच व्याख्यानमाला असल्याने श्रोत्यांची गर्दी झाली होती.

हेही वाचा: Delhi Pollution: बंद करता येऊ शकणाऱ्या उद्योगांची यादी काढा: सुप्रीम कोर्ट

या कार्यक्रमावेळी 17 जुलै 1990 रोजी एक दिवस ते मंगसुळीच्या प्रसिद्ध खंडोबा मंदिरास दर्शनास आले होते. त्यादिवशी सकाळी नऊच्या दरम्यान बाबासाहेब मंगसुळीच्या खंडोबा मंदिरात आले. मंदिरात असलेली देवालये, दीपमाळा, बांधकामाची पाहणी केली. गाभारयात त्यांनी खंडोबा, म्हाळसादेवीचे दर्शन घेतले. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे म्हणाले होते की, `माझे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे. उगारला व्याख्यानासाठी आल्याने मुद्दाम मंगसुळी खंडोबाच्या दर्शनासाठी आलो आहे.`

बाळाप्पा पुजारी, बातमीदार रंगनाथ देशिंगकर यांनी बाबासाहेबांना मंदिरासह साखळी तोडण्याच्या कार्यक्रमाची माहिती दिली होती.

loading image
go to top