
मोबाईल परत घेतल्याच्या कारणावरून तरुणाचा खून
esakal
Sangli Mobile Dispute Killing : मोबाईल परत घेतल्याच्या कारणावरून जावेद मुबारक अत्तार (वय ४२) याने जयंत विश्वास भगत (वय ४०, दोघे खानापूर) या तरुणाचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलिसांनी सांगितले. दरम्यान, खुनी हल्ल्यानंतर पळून गेलेला अत्तार यास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.