
आटपाडी : गेल्या काही दिवसांपासून आटपाडी तालुक्यात सुरू असलेल्या चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांची घरफोडी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झरे येथे चोरट्यांनी दुकान आणि सीसीटीव्ही कॅमेरे फोडून चाळीस हजारांवर डल्ला मारला, तर शेजारीच चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला.