
सांगली : पिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाकडून पीक स्पर्धा घेण्यात येत आहे. तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरांवर स्पर्धा होणार आहे. शेतीचे एकरी उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. पीक स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी सांगितले.